जाहिरात
मराठी बातम्या / मनी / फक्त एकदा करा गुंतवणूक अन् 10 वर्ष करा बक्कळ कमाई, 'हा' बिझनेस करेल मालामाल!

फक्त एकदा करा गुंतवणूक अन् 10 वर्ष करा बक्कळ कमाई, 'हा' बिझनेस करेल मालामाल!

शेवग्याच्या शेंगांचा व्यवसाय

शेवग्याच्या शेंगांचा व्यवसाय

Shevga farming business: आज आपण शेवग्याच्या शेतीविषयी जाणून घेणार आहे. ही शेती सुरु करुन तुम्ही वार्षिक 6 लाख म्हणजेच 50 हजार रुपये महिना कमावू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

**Shevga farming business:**सध्याच्या काळात लोक आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीला चांगलीच गती मिळालीये. तुम्हालाही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही शेतीचा पर्याय निवडू शकता. यासाठी ड्रमस्टिक शेती हा चांगला पर्याय आहे. म्हणजेच शेवग्याच्या शेंगांची शेती. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत आणि दुसरं म्हणजे ते सहजपणे लागवड करता येते. आज आपण शेवग्याच्या शेंगांच्या लागवडीबद्दल जाणून घेणार आहोत. ही शेती सुरू करून तुम्ही वार्षिक 6 लाखांपर्यंत म्हणजे महिन्याला 50 हजार रुपये कमवू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

या व्यवसायासाठी तुम्हाला मोठ्या जमिनीची गरज नसते. 10 महिन्यांनी लागवड केल्यानंतर शेतकरी एक एकरामध्ये एक लाख रुपये कमवू शकतो. ड्रमस्टिक म्हणजेच शेवगा ही एक औषधी वनस्पती आहे. कमी खर्चात येणाऱ्या या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा पेरणी केली की चार वर्षे पेरणी करावी लागत नाही.

शेवग्याची शेती

शेवगा ही एक औषधी वनस्पती आहे. अशा वनस्पतींच्या लागवडीमुळे त्याची मार्केटिंग आणि निर्यात करणंही सोपं झालंय. योग्य पद्धतीने पिकवलेल्या औषधी पिकांना भारतातच नव्हे तर जगभरात खूप मागणी आहे. शेवग्याला इंग्रजीत ड्रमस्टिक असे म्हणतात. त्याचे वैज्ञानिक नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. याच्या लागवडीला जास्त पाणी लागत नाही आणि देखभाल देखील कमी करावी लागते. शेवग्याची लागवड करणे खूप सोपे आहे आणि जर तुम्हाला ती मोठ्या प्रमाणावर करायची नसेल तर तुम्ही तुमच्या सामान्य पिकासह त्याची लागवड करू शकता.

News18

कोणत्या क्षेत्रात येतं हे पिक?

हे पीक उष्ण भागात सहज वाढते. त्याला जास्त पाणीही लागत नाही. थंड प्रदेशात त्याची लागवड फारशी फायदेशीर नाही, कारण त्याला फुलण्यासाठी 25 ते 30 अंश तापमानाची आवश्यकता असते. कोरड्या वालुकामय किंवा चिकणमाती जमिनीत ते चांगले वाढते. पहिल्या वर्षानंतर वर्षातून दोनदा उत्पादन होते आणि साधारणपणे एक झाड 10 वर्षे चांगले उत्पादन देते. कोईम्बतूर 2, रोहित 1, पीकेएम 1 आणि पीकेएम 2 हे त्याचे मुख्य वाण आहेत.

Business Idea: दरमहा कमवा 50 हजार, गुंतवणूक न करता सुरु होईल हा बिझनेस!

किती कमाई होईल?

एका एकरात सुमारे 1,200 झाडे लावता येतात. एक एकरात शेवग्याचे रोप लावण्यासाठी सुमारे 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. फक्त शेवग्याची पाने विकून तुम्ही वर्षाला 60 हजार रुपये कमवू शकता. दुसरीकडे, शेवग्याचे उत्पादन करून, तुम्ही वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात