Business Idea: नोकरी करुन लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस सुरु करावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कारण लोकांची चाकरी करणं कोणालाच आवडत नाही. सर्वांना आपल्या कामाचं मालकं व्हाव असं वाटतं. मात्र अनेकदा भांडवल नसल्यामुळे लोक व्यवसाय सुरु करु शकत नाही. मात्र आज आपण असा बिझनेस प्लान पाहणार आहोत. जो कोणत्याही इन्व्हेस्टमेंटशिवाय तुम्हाला हजारो रुपये दरमहा कमाई देऊ शकतो. मात्र या बिझनेससाठी तुम्हाला देखील काही तयारी करावी लागेल. मात्र काही सोप्या प्रोसेसने तुम्ही काही दिवसांमध्ये ही तयारी पूर्ण करु शकता. आपण टॅक्सी सर्व्हिस बिझनेसविषयी आज बोलत आहोत.
कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता टॅक्सी सर्व्हिसचा बिझनेस सुरु केला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया. कोणतीही गुंतवणूक न करता कसा सुरु करावी टॅक्सी सर्व्हिस आणि दरमहा हजारो ते लाखोंची कमाई कशी करावी?
पहिले करा हे काम
-टॅक्सी सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला कमर्शियल व्हीकल ड्रायव्हिंग लायसन्स घ्यावा लागेल. त्याची एक सामान्य टेस्ट आहे, ती उत्तीर्ण केल्यावर, तुम्हाला कमर्शियल लायसेंस मिळेल. -यानंतर तुम्हाला कंपनी रजिस्टर करावी लागेल. ती प्रायव्हेट लिमिटेड किंवा प्रॉपरायटर फर्म असू शकते. -महत्त्वाचं म्हणजे, टॅक्सी सेवेसाठी टॅक्सीची गरज आहे. अशा वेळी जवळपास प्रत्येक बँक टॅक्सी सेवेसाठी व्हेईकल ऑन रोड फायनान्स करत आहे. या सुविधेचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता. मात्र, टॅक्सीसाठी घेतलेली कार तुमच्या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असेल आणि त्यासाठी तुम्हाला गॅरेंटरचीही आवश्यकता असेल.
FD बेस्ट की डेट म्यूच्युअल फंड? कशात जास्त सुरक्षित असतो पैसा? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतातईएमआय किती येईल
तुम्ही 8 लाख रुपयांपर्यंतच्या कारला फायनेंस करत असाल तर याचा ईएमआय 7 वर्षांच्या लोन टेन्योरसाठी 15 हजार रुपयांपर्यंत येईल. मात्र हे पूर्णपणे बँकेच्या अटींवर अवलंबून असते. हे काहीवेळा जास्तही असू शकतं.
तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरं की बनावट? कसं ओळखायचं? ही आहे ट्रिककमाई कशी कराल?
तुम्ही तुमची टॅक्सी ओला किंवा उबेरशी करार करुनही चालवू शकता. तसंच तुम्ही तुमचा व्यवसाय स्वतः चालवू शकता. बाजारात टॅक्सीचा प्रति किलोमीटर दर 10 रुपयांपर्यंत सुरू आहे. जर तुम्ही एका महिन्यात 6 ते 7 हजार किमी. ही टॅक्सी चालवली तर महिन्याला 70 हजार रुपये येतात. यासोबतच रात्रीचे ड्रायव्हिंग आणि वेटिंग चार्जेसही वेगळे आहेत.