हा व्यवसाय करून अवघ्या 4 महिन्यात कमवा 8 लाख रुपये; सरकारही करेल मदत

How to start Cucumber Farming in Maharashtra: तुम्ही या व्यवसाय संकल्पनेतून (Business Idea) कमी गुंतवणूक (Low Investment) करून चांगले पैसे कमावू शकता (How to earn money).

How to start Cucumber Farming in Maharashtra: तुम्ही या व्यवसाय संकल्पनेतून (Business Idea) कमी गुंतवणूक (Low Investment) करून चांगले पैसे कमावू शकता (How to earn money).

  • Share this:
    नवी दिल्ली, 28 मार्च:  जर तुमच्याकडे नोकरी नसेल किंवा तुम्हाला नोकरी करण्याचा कंटाळा आला असेल आणि अधिक पैसे मिळविण्यासाठी तुम्ही स्वतःचा व्यवसाय (How can I start my own business) सुरू करू इच्छित आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही या व्यवसाय संकल्पनेतून (Business Idea) कमी गुंतवणूक (Low Investment) करून चांगले पैसे कमावू शकता (How to earn money). अशाप्रकारे पैसे कमावण्यासाठी उत्तम कल्पना म्हणजे शेती (Farming). आता शेतीत काय करावे हा प्रश्न असेल तर तुम्ही काकडीचे पीक (Cucumber Farming)  घेऊ शकता. जे तुम्हाला कमी वेळात अधिक पैसे मिळवण्याची संधी देईल. तर मग काकडीच्या शेतीचा व्यवसाय कसा करायचा ते जाणून घेऊया? (हे वाचा-2 महिन्यात महागणार सोनं; हे ठरू शकतात गुंतवणूक करण्याचे 5 फायदेशीर पर्याय) मार्चमध्ये काकडीची लागवड करून मिळवा लाखो रुपये या पिकाचा कालावधी 60 ते 80 दिवसांत पूर्ण होतो. तसे म्हटले तर काकडी उन्हाळ्यात होते. पण पावसाळ्यात काकडीचे पीक जास्त येते. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा काकडीच्या पेरणीसाठी सर्वोत्तम असतो. काकडीची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आणि वाळू असणारी मातीची जमीन या उत्पादनासाठी चांगली मानली जाते. काकडी लागवडीसाठी जमिनीचा पीएच 5.5 ते 6.8 चांगला मानला जातो. काकडीची लागवड नद्या व तलावाच्या काठावरही करता येते. (हे वाचा- रतन टाटांशी पंगा घेणं पडलं महागात; आता 22000 कोटींचं कर्ज कसं फेडणार?) काय आहे शेतकऱ्यांचं म्हणणं? उत्तर प्रदेशमधील शेतकरी दुर्गाप्रसाद जे काकडीच्या शेतीतून लाखो रुपये कमावतात, ते सांगतात की- शेतीत नफा मिळवण्यासाठी त्यांनी काकडीची लागवड सुरू केली. अवघ्या 4 महिन्यांत त्यांनी 8 लाख रुपये कमावले. त्यांनी त्यांच्या शेतात नेदरलँड्समधील काकड्यांची लागवड केल आहे.  दुर्गाप्रसाद यांच्या मते नेदरलँडमधून काकडीचं हे बियाणं मागवून शेती करणारे ते पहिलेच शेतकरी आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रजातीमध्ये काकडीमध्ये बिया नसतात. ज्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये या काकडीची मागणी खूप जास्त आहे. दुर्गाप्रसाद म्हणतात की बागायती विभागाकडून 18 लाख रुपयांचे अनुदान घेतल्यानंतर त्यांनी शेतात सेडनेट हाऊस बांधले होते. अनुदान घेतल्यानंतरही त्यांना स्वत: हून 6 लाख रुपये खर्च करावा लागला. याशिवाय त्यांनी नेदरलँड्सकडून 72 हजार रुपये किंमतीचे बियाणे मागितले. बियाणे पेरल्यानंतर 4 महिन्यांत त्याने 8 लाख रुपयांची काकडी विकली. का आहे जास्त फायदा? या काकडीची अशी खासियत आहे की, सामान्य काकड्यांच्या तुलनेत ही काकडी दुप्पट पीक देते. बाजारात स्वदेशी काकडीची किंमत 20 रुपये प्रति किलोच्या आसपास असते, तर नेदरलँडमधील या काकडीची विक्री 40 ते 45 रुपये किलोच्या हिशोबाने होते. शिवाय या काकडीची मागणी वर्षभर असते. मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाची मदत घेऊ शकता.
    First published: