मराठी बातम्या /बातम्या /मनी /2 महिन्यात महागणार सोनं; हे ठरू शकतात गुंतवणूक करण्याचे 5 फायदेशीर पर्याय

2 महिन्यात महागणार सोनं; हे ठरू शकतात गुंतवणूक करण्याचे 5 फायदेशीर पर्याय

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याच्या किमती लवकरच वाढू शकतात. अशा स्थितीत तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार नक्की करू शकता. कुठे आणि कशी करायची ही गुंतवणूक?

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याच्या किमती लवकरच वाढू शकतात. अशा स्थितीत तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार नक्की करू शकता. कुठे आणि कशी करायची ही गुंतवणूक?

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याच्या किमती लवकरच वाढू शकतात. अशा स्थितीत तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार नक्की करू शकता. कुठे आणि कशी करायची ही गुंतवणूक?

    नवी दिल्ली, 28 मार्च: देशात लग्न हंगामात सोन्याला (latest Gold rate) विशेष महत्व प्राप्त होते. परंतु,गुंतवणूक (gold Investment) म्हणून सोनं हा उत्तम पर्याय आहे. सध्या सोन्याच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. आतापर्यंत सोन्याचे दर निचांकी म्हणजेच 11,500 रुपयांनी घटले आहेत. शनिवारी 22 कॅरेट सोन्याचा दर 44,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा कमी होतो. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार नक्की करू शकता.

    येत्या दोन महिन्यात होऊ शकते महाग

    तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याच्या किमती लवकरच वाढू शकतात. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अॅण्ड करन्सी) अनुज गुप्ता याबाबत म्हणाले,की येत्या 2 महिन्यात सोन्याचे दरप्रति 10 ग्रॅम 48,000 रुपयांपर्यंत जातील अशी आशा आहे. तर येत्या 2 महिन्यात चांदीचे दर 70,000 ते 72,000 रुपयांदरम्यान असतील. अन्य अभ्यासकांच्या मते सोन्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता असून हे दर 45,000 रुपयांवरुन 48,000 रुपयांवर पोहोचतील.

    गत 1 वर्षात मिळाला 17 टक्के रिटर्न

    मागील वर्षी म्हणजेच मार्च 2020मध्ये सोने 38,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आता हेच दर 45,000 रुपयांपर्यंत आहेत. म्हणजेच सोन्यातून एका वर्षात सुमारे 17 टक्के रिटर्न मिळाला आहे. तसेच मागील 5 वर्षात सोन्यातून 61 टक्के रिटर्न मिळाला आहे. मार्च 2016 मध्ये सोन्याचे दर 28,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

    वाचा - पुढील 2 महिन्यांत महागणार सोनं; पटापट तपासा लेटेस्ट GOLD PRIC

    सॉवरेन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bond)

    दागिने,नाणी किंवा विटा यास्वरुपात सोन्यामध्ये गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध आहेत.परंतु,या सर्वात चांगला पर्याय ठरु शकतो तो म्हणजे सॉवरेन गोल्ड बॉण्ड. या सरकारी योजनेमुळे जोखीम खूप कमी होऊन चांगले रिटर्न्स मिळू शकतात. सॉवरेन गोल्ड बॉण्ड हे आरबीआय जारी करते,त्यामुळे त्याच्या पारदर्शकतेबाबत कोणतिही शंका राहात नाही. त्यामुळे या बॉण्डमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरते. यात सोन्याच्या दराबरोबरच वर्षाला2.5टक्के फिक्स्ड रिटर्न देखील मिळतो.

    गोल्ड एक्सचेंज ट्रेडड फंडस(Gold ETF)

    शेअरप्रमाणेच सोने खरेदी करण्याच्या सुविधेला गोल्ड इडीएफ म्हटलं जातं. ही म्युचअल फंड योजना आहे. हा सोने गुंतवणूकीचा सर्वात स्वस्तातील पर्याय आहे. हा एक्स्चेंज ट्रेडड फंड असल्यानं स्टॉक एक्स्चेंजवर तो खरेदी –विक्री केला जातो. गोल्ड ईटीएफ बेंचमार्क स्पॉट हा सोन्याचे दर असल्याने आपण सोन्याच्या वास्तविक किंमतीच्या आसपास खरेदी करु शकतो. गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ट्रेडींग डिमॅट खाते असणं आवश्यक आहे. यात सोने खरेदी युनिटमध्ये केली जाते. याच्या विक्रीनंतर तुम्हाला सोन्याऐवजी त्याच्या त्यावेळच्या बाजारभावानुसार रक्कम मिळते.

    गोल्ड म्युचअल फंड (Gold Mutual Fund)

    गोल्ड ईटीएफच्या तुलनेत गोल्ड म्युचअल फंडात गुंतवणूक करणं अधिक सोपं असतं. तुम्ही थेट आनलाईन पध्दतीनं किंवा त्याच्या डिस्ट्रीब्युटरमार्फत गोल्ड म्युचअल फंडात गुंतवणूक करु शकता. दुसरीकडे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट खातं असणं आवश्यक आहे. परंतु,गोल्ड म्युचअल फंडात एएमसी परताव्यासाठी गोल्ड ईटीएफमध्ये कॉपर्स गुंतवणूक करतात. याव्यतरिक्त गोल्ड म्युचअल फंड गुंतवणूकदारांना एसआयपीव्दारे गुंतवणूक करण्यास परवानगी देतात. गोल्ड म्युचअल फंड हे ओपन एंडेड गुंतवणूक उत्पादन आहे. जे गोल्ड एक्स्चेंज ट्रेडड फंडात गुंतवणूक करतात आणि त्यांचीनेट असेट व्हॅल्यू (Net Asset Value)ईटीएफच्या कामगिरीवर अवलंबून असते.

    पेमेंट App व्दारे होऊ शकते सोने खरेदी

    तुम्ही तुमच्या स्मार्टफोनव्दारेही डिजीटल गोल्डमध्ये (Digital Gold)गुंतवणूक करु शकता. यासाठी फार खर्च करण्याचीही आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि अर्थिक कुवतीनुसार जितके पाहिजे तितके सोने खरेदी करु शकता. ही सुविधा अॅमेझॉन पे,गुगल पे,पेटीएम,फोन पे आणि मोबीक्विक यांसारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

    First published:

    Tags: Gold, Investment, Personal finance