नवी दिल्ली, 27 मार्च : सुप्रीम कोर्टाने टाटा-मिस्त्री वादात टाटा ग्रुपच्या समर्थनार्थ निर्णय दिला आहे. यामुळे शापूरजी पालोनजी ग्रुपच्या (Shapoorji Pallonji group) अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे कर्जात बुडालेल्या कर्ज पुनर्गठन (debt restructuring) योजना काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे टाटा सन्समझ्ये एसपी ग्रुपच्या भागभांडवलीच्या मूल्यांकनाबाबत दोन्ही पक्षांमध्ये सहमती होणं कठीण असल्याचं दिसत आहे.
एसपी ग्रुपच्या कोरोना व्हायरस महासाथीबाबत सादर केलेल्या आरबीआयच्या विशेष योजनेअंतर्गत 22,000 करोड रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याची योजना आहे. ते आपलं कर्ज चुकविण्यासाठी टाटा सन्समधील आपली भागीदारीची विक्री करू इच्छित आहे. एसपी ग्रुपच्या टाटा सन्समध्ये 18.4 टक्के भागीदारी आहे, ज्यातील अर्धी भागीदारी 5074 कोटी रुपयात एक्सिस बँक आणि आयडीबीआय बँकेत कर्जाऊ ठेवण्यात आली आहे. उरलेल्या 9.2 टक्के भागीदारीचा एक भाग ते कर्जाऊ देऊ इच्छित आहेत. ज्यावर टाटाने यावर आक्षेप नोंदवला आहे. एसपी ग्रुपच्या टोरंटोची कंपनी ब्रुकफील्ड एसेट मॅनेजमेंटकडून 3750 कोटी रुपये एकत्र करण्याची योजना आहे.
हे ही वाचा-Spicejet ची मोठी घोषणा! कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर पूर्ण पैसे परतएसपी ग्रुप अडचणीत
एसपी ग्रुपचं म्हणणं आहे की, टाटा सन्समध्ये त्यांच्या भागीदारीचं मूल्य 1.5 लाख कोटी रुपये आहे. दुसरीकडे टाटा सन्सचं म्हणणं आहे की, एसपीच्या स्टेकचं मूल्य 70 हजार ते 80 हजार कोटी रुपये आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत दोन्ही पक्ष आपल्यानुसार व्याख्या करीत आहेत. एसपी ग्रुपचं म्हणणं आहे की, कोर्टाने टाटा सन्स यांची ती याचिकादेखील फेटाळली आहे. ज्यात एसपी ग्रुपला कंपनीचे शेअर कर्जाऊ ठेवण्यापासून रोखण्याची मागणी केली होती.
दुसरीकडे टाटा सन्सचं म्हणणं आहे की, कोर्टाने त्यांच्या याचिकेचा स्वीकार केला आहे. जर टाटा सन्सचं म्हणणं खरं असेल तर यातून एसपी ग्रुपच्या अडचणी वाढू शकतात. त्यांना एक्सिस बँक आणि आयडीबीआय बँकेत कर्जाऊ ठेवलेले टाटा सन्सचे शेअर सोडवावे लागतील. सुप्रीम कोर्टासह एसपी ग्रुपच्या त्या अंतरिम याचिकेलादेखील फेटाळाण्यात आले, ज्यात टाटा सन्ससोबत ऑनरशिप इंट्रेस्टला वेगळं करण्याची मागणी केली होती
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.