जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कमी वयातही श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला, बस दर महिन्याला करा 'हे' काम

कमी वयातही श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला, बस दर महिन्याला करा 'हे' काम

कमी वयातही श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला, बस दर महिन्याला करा 'हे' काम

काय आहे 50, 20, 20, 10 फॉर्म्युला? कसा तुम्हाला श्रीमंतीच्या मार्गापर्यंत पोहोचवणार?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुम्ही नुकतेच नोकरीला लागलाय किंवा तुम्ही नोकरी करताय मात्र अजूनही तुमचं म्हणावं तसं बजेट बसत नाही. अगदी महिन्याच्या शेवटी ओढाताण होते तर मग आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा आणि सिक्रेट फॉर्म्युला सांगणार आहोत. जो वापरून तुम्ही तुमचं बजेटही बसवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडी बचतही करू शकता. अंथरुण पाहून पाय पसरावेत असं म्हटलं जातं. मात्र आपलं अंथरुण कसं मोठं करायचं हे आपल्या हातात असतं. आपण किती पैसे आपल्या भविष्यासाठी बचत करतो यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. नाहीतर आता मजा करून पैसे उडवून भविष्यात हातात काहीच नाही अशी वेळ कोणावरही येऊ नये. जेव्हा खर्चाचा विचार येतो तेव्हा अनेकांच्या मनात विचार येतो की, आपण कमावत कशासाठी आहोत? आयुष्य एकदाच मिळालं आहे आपल्याला हवे तसे आणि हवे तेवढा पैसा खर्च करुन आयुष्य एन्जॉय करुया असंही आपल्याला वाटत असतं पण थोडा मोह आवरायला हवा आणि नियोजन करायला हवं. तरच आपल्याला आयुष्य छान जगताही येईल आणि बचतही करणं सोपं होईल.

घरबसल्या तुमच्या व्यवसायासाठी फ्रीमध्ये वेबसाइट, App बनवा; कोडिंगची आवश्यकता नाही

काय आहे 50, 20, 20, 10 फॉर्म्युला? तुम्ही जर नुकतेच नोकरीला लागला असाल तर तुमचे खर्च एका पानावर लिहून काढा. रोज तुमचे खर्च लिहिल्याने तुम्ही कुठे वायफळ खर्च करता ते लक्षात येईल. तुमच्या पगाराचे 4 हिस्से करा. सुरुवातीला 50-50 एक 50 टक्के हिस्सा हा तुमचा सगळा गरजेचा खर्च, ज्यामध्ये रेंट असेल तर राहाणं खाणं आणि जीवनावश्यक वस्तू या गोष्टी येतील. दुसरा 50 चा हिस्सा हा तुम्हाला 20-20-10 मध्ये विभागायची आहे. यातला 20 टक्के भाग हा तुम्ही स्वत:वर छान जगण्यासाठी मजा करण्यासाठी किंवा तुमच्या स्वत:साठी खर्च करू शकता. तुम्हाला असं वाटलं की या महिन्यात मला ते खर्च करायचे नाहीत तर तुम्ही ते ठेवून पुढच्या महिन्यात आधीचे 20 आणि पुढच्या महिन्याचे 20 असे 40 टक्के खर्च करू शकता.

सोने की चांदी कोणता म्युच्युअल फंड तुम्हाला देईल जास्त रिटर्न?

दुसरा 20 टक्के हिस्सा हा आपत्कालीन खर्चासाठी म्हणजे उद्या तुम्हाला रुग्णालयात जावं लागलं किंवा मोठं आजारपण आलं तर तुमच्याकडे असायला हवा. 10 टक्के पैसे हे तुमच्या दीर्घकालीन मुदतीसाठी बचत करायला हवेत. ते तुम्ही फंडमध्ये ठेवा, SIP करा किंवा PPF ला ठेवा पण ते तुम्ही एकदा सेविंगला टाकले की विसरून जायचे असे असायला हवेत. दर महिन्याला तुम्ही 10 टक्के रक्कम ही साठवलीत तरी 12 महिन्याची तुमच्याकडे एक मोठी रक्कम जमा होईल. जेव्हा पगार वाढेल तेव्हा वाढलेल्या पगारातील रक्कम ही तुम्ही पुन्हा एकदा बचतीमध्ये ठेवू शकता किंवा ते पैसे गुंतवू शकता. असं करत गेल्यास कमी वयात तुमच्याकडे जास्त पैसे साठतील आणि तुम्हाला त्याचा मोठा फायदा होईल.

News18लोकमत
News18लोकमत
दिवाळीत वाढतोय ऑनलाइन सट्टेबाजीचा ट्रेंड, त्यावर किती कर आकारला जातो? वाचा सविस्तर

उदाहरणार्थ तुमचा पगार 1 लाख रुपये इतका आहे. यापैकी तुम्ही 50 हजार रुपये म्हणजेच 50 टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला खर्च करु शकता. यापैकी 20 टक्के रक्कम म्हणजे 20 हजार रुपयांत तुम्ही तुमचे शौक पूर्ण करु शकता. उरलेले 10 हजार रुपये तुम्ही गुंतवणूक करु शकता आणि 10 हजार रुपये तुम्ही इमरजन्सी फंड ठेवू शकता. जर तुम्ही वर्षभर प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये गुंतवणूक कराल तर एका वर्षात जवळपास 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत तुम्ही सेव्हिंग करु शकता. तेवढेच तुमच्याकडे इमरजन्सी फंडचे पैसे जमा होणार आहेत. ते जर तुम्हाला या वर्षा लागले नाहीत तर तुमच्याकडे एकूण 2 लाख 40 हजार रुपयांची रक्कम जमा होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात