मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घरबसल्या तुमच्या व्यवसायासाठी फ्रीमध्ये वेबसाइट, App बनवा; कोडिंगची आवश्यकता नाही

घरबसल्या तुमच्या व्यवसायासाठी फ्रीमध्ये वेबसाइट, App बनवा; कोडिंगची आवश्यकता नाही

घरबल्या तुमच्या व्यवसायासाठी फ्रीमध्ये वेबसाइट, App बनवा

घरबल्या तुमच्या व्यवसायासाठी फ्रीमध्ये वेबसाइट, App बनवा

इंटरनेटवर अशा अनेक वेबसाइट्स आहेत, ज्यातून आपण विनामूल्य अ‍ॅप्स बनवू शकतो. विशेष म्हणजे अॅप बनवण्यासाठी कोडिंग करण्याचीही गरज भासणार नाही. चला जाणून घेऊया या वेबसाइट्सबद्दल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 24 ऑक्टोबर : अनेकांना आपल्या व्यावसायची वेबसाईट किंवा अ‍ॅप बनवण्याची इच्छा असते. मात्र, पैशाअभावी ते करता येत नाही. तुम्ही कधी एखादे सॉफ्टवेअर बनवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते किती अवघड आहे याची जाणीव तुम्हाला नक्कीच असेल. वास्तविक, अ‍ॅप बनवण्यासाठी तुम्हाला खूप कोडिंग करावे लागते, ज्यासाठी खूप वेळ लागतो. मात्र, इंटरनेटवर अशा अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत ज्यातून आपण विनामूल्य अॅप्स तयार करू शकतो. त्यासाठी आपल्याला कोड करण्याची देखील आवश्यकता नाही.

विशेष म्हणजे मोठे इंडस्ट्रियल अ‍ॅप्स कोडिंगद्वारे तयार केले जातात. मात्र, जर तुम्हाला अॅप्स कसे बनवायचे हे शिकायचे असेल तर या वेबसाइट्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. म्हणून आता आम्ही या वेबसाइट्सबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. ज्या तुम्हाला अ‍ॅप्स बनवण्यात तुमची मदत करू शकतात.

चला अशा काही वेबसाइट्सबद्दल जाणून घेऊया:

Apphive

या वेबसाइटच्या मदतीने तुम्ही विनामूल्य अॅप डिझाइन करू शकता. हे विनामूल्य आणि सशुल्क सब्सक्रिप्शन दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या मोफत सबस्क्रिप्शनमध्ये, तुम्हाला 50MB क्लाउड स्टोरेजसह अॅपची आवृत्ती संग्रहित करण्याचा पर्याय मिळेल. ही वेबसाइट तुम्हाला अॅप तसेच काही टेम्प्लेट्स डिझाइन करण्यासाठी परवानगी देते. तुम्ही तुमच्या आवडीचे टेम्पलेट निवडून सहजपणे अ‍ॅप तयार करू शकता किंवा कस्टमाइझ करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणताही कोड लिहिण्याची अजिबात गरज नाही. यासोबतच तुम्ही ते प्ले स्टोर अ‍ॅप्स स्टोअरमध्येही पब्लिश करू शकता.

Andromo

या वेबसाइटवर तुम्ही विनामूल्य ट्रायल म्हणून एक अ‍ॅप तयार करू शकता, त्यानंतर तुम्हाला त्याचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. ही वेबसाइट तुम्हाला कोडिंगशिवाय अॅप तयार करण्याची परवानगी देते ज्यामध्ये तुम्ही सर्व फीचर टाकू शकता आणि Apple किंवा Android साठी पब्लिश करू शकता. हे तुम्हाला तुमच्या वेबसाइटवर अ‍ॅप्स तयार करण्याचे प्रशिक्षण देखील देते.

वाचा - Fake Shopping Website: बनावट शॉपिंग वेबसाइटवर क्लिक कराल तर लागेल चुना, ‘या’ 5 सोप्या मार्गांनी ओळखा

App my site

ही वेबसाइट विनामूल्य अ‍ॅप्स तयार करण्यास परवानगी देते. येथेही तुम्ही कोडिंगशिवाय अ‍ॅप तयार करू शकता आणि ते Android साठी पब्लिश करू शकता. या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या आवडीचे अ‍ॅप डिझाइन करू शकता आणि ते कोडिंगशिवाय तयार करू शकता.

Teta

ही वेबसाइट तुम्हाला विनामूल्य अ‍ॅप्स तयार करण्याची परवानगी देते. तुम्हाला त्याच्या सशुल्क सबस्क्रिप्शनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील मिळतात. या वेबसाइटवर तुम्ही व्यावसायिक अ‍ॅप डिझाइन करू शकता. तुम्हाला या वेबसाइटवर कोणतेही कोडिंग करण्याची गरज नाही. ही वेबसाइट तुमच्यासाठी डेटाबेस तयार करते तसेच तुम्हाला तुमचा प्रोटोटाइप शेअर करण्याचा पर्यायही देते. अॅप तयार करून, तुम्ही ते प्लेस्टोअर आणि अ‍ॅप्पल स्टोअरवर पब्लिश करू शकता.

Appypie

ही वेबसाइट तुम्हाला श्रेणीनुसार अ‍ॅप बनवण्यासाठी सजेशन देते. येथे तुम्ही Android आणि iPhone दोन्हीसाठी अ‍ॅप्स तयार करू शकता तसेच कोणत्याही वेबसाइटला अ‍ॅपमध्ये रूपांतरित करू शकता.

येथेही तुम्ही बाकीच्या वेबसाइटप्रमाणे तुमच्या आवडीची फीचर जोडून कोडिंगशिवाय अ‍ॅप तयार आणि पब्लिश करू शकता. हे विनामूल्य आणि सशुल्क सब्सक्रिप्शनसह उपलब्ध आहे.

First published:

Tags: Website