मुंबई : आपल्याकडे दिवाळीमध्ये सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा नव्या वस्तू घेण्याचा ट्रेंड आहे. दिवाळीच्या निमित्ताने विशेषतः धनतेरसला लोक सोने-चांदी खरेदी करतात. आता काही लोक सोने-चांदी फंड आणि ईटीएफ यामध्ये गुंतवणूक करण्यातही लोकांचा कल आहे. काही म्युच्युअल फंड हाऊसेसनी दिवाळीच्या हंगामात नवीन चांदी आणि गोल्ड ईटीएफ आणले आहेत. सध्या बाजारात अशा दोन योजना उपलब्ध आहेत.
आर्थिक मंदीदरम्यान सोन्याला चांगली झळाळी येते. त्यामुळे सोन्या-चांदीच्या खरेदीकडे लोकांचा कल अधिक असतो. तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याऐवजी तेच पैसे EIFमध्ये गुंतवले तर? म्युच्युअल फंड हाऊसच्या म्हणण्यानुसार ETF हा सर्वोत्तम पर्याय आहे.
मुहूर्त ट्रेडिंग 2022 : 'या' शेअर्समध्ये पैसे गुंतवा आणि बंपर रिटर्न्स मिळवा
सोन्या-चांदीतील गुंतवणुकीमुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला स्थैर्य प्राप्त झाले आहे. तुमच्या पोर्टफोलियोमध्ये सोनं असायला हवं असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चांदी असायलाच हवी हा अट्टाहास मात्र नाही.
सोन्या चांदीच्या दरात सुस्ती आल्याचं दिसत आहे. लाँग टर्म इन्वेस्टमेंटसाठी इथे गुंतवणूक केली जाऊ शकते. सोनं हा तुमच्या पोर्टफोलियोचा एका चांगला भाग असू शकतो. सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये वेगवेगळी गुंतवणूक करा. कॉम्बो गुंतवणूक करणं तोट्याचं ठरू शकतं.
मुहूर्त ट्रेडिंग 2022: 1 तासात पैसे Invest करतान करू नका 'या' चुका, मिळेल 'तगडा रिटर्न'
या दिवाळीत गुंतवणूक करायची असेल तर मिक्स्ड प्रॉडक्टऐवजी गोल्ड फंडापासून सुरुवात करा. सध्या म्युच्युअल फंड बाजारात 22 गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड उपलब्ध आहेत. त्यापैकी 20 फंड आणि ईटीएफ 10 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold bond, Share market