मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI मध्ये अल्पवयीन मुलांचं बचत खातं उघडायचे आहे? फॉलो करा या 4 सोप्या स्टेप्स

SBI मध्ये अल्पवयीन मुलांचं बचत खातं उघडायचे आहे? फॉलो करा या 4 सोप्या स्टेप्स

देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लहान मुलांसाठी दोन प्रकारचे बचत खाते (Children Saving Account) देऊ करते. वाचा सविस्तर

देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लहान मुलांसाठी दोन प्रकारचे बचत खाते (Children Saving Account) देऊ करते. वाचा सविस्तर

देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लहान मुलांसाठी दोन प्रकारचे बचत खाते (Children Saving Account) देऊ करते. वाचा सविस्तर

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: बँकांमध्ये आता मोठ्यांसोबतच लहान मुलांसाठीसुद्धा अनेक बचत खाती आहेत. या खात्यांमध्ये आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पैशांची बचत करू शकता. मुलांच्या बचत खात्याचा (Children Saving Account)  मोठा फायदा म्हणजे तो हळूहळू त्यांच्यासाठी एक मोठा फंड तयार करतो. मुलांना आर्थिक शिस्त लागण्यासाठी देखील बँक खाते उघडणे हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला तुमच्या अल्पवयीन मुलाचं बचत खातं देशाच्या सर्वांत मोठ्या कर्जदाता बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये उघडायचं असेल तर तुम्हाला इथं दिलेल्या 4 सोप्या स्टेप्स वापरून हे काम पूर्ण करता येईल.

जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता

एसबीआय (SBI) मुलांसाठी दोन प्रकारची बचत खाती ऑफर करते. यात, 'पहला कदम' हे बचत खाते 10 वर्षांखालील मुलांसाठी आहे. त्याच वेळी, 'पहली उडान' हे खातं ज्या मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी आहे. 'पहला कदम' मध्ये मुलाचं खातं पालकांबरोबर संयुक्त खातं म्हणून उघडलं जातं. 'पहली उडान' हे खातं मुलाच्या नावे काढण्यात येते. दोन्ही खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स असणं आवश्यक नाही. त्याचबरोबर या खात्यात तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता.

मुलांसाठी बचत खातं उघडण्यासाठी 4 सोप्या स्टेप्स

-प्रथम एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर पर्सनल बँकिंगवर क्लिक करा. त्यानंतर अकाउंट्स टॅबवर क्लिक करा आणि सेव्हिंग अकाऊंट ऑफ मायनर्स पर्याय निवडा.

(हे वाचा-Gold Price Today: मोठ्या घसरणीनंतर सोन्याला पुन्हा झळाळी, वाचा काय आहेत नवे दर)

-त्यानंतर अप्लाय नाउवर क्लिक करा. त्यानंतर आपण डिजिटल आणि इंस्टा सेव्हिंग खात्याची पॉप-अप फीचर्स पहाल. ते बंद करा.

-तुमच्या पुढे एसबीआय योनोची (SBI YONO) वेबसाइट ओपन होईल. याठिकाणी ओपन ए डिजिटल अकाउंटवर क्लिक करायचंय.

-पुन्हा एकदा अप्लाय नाउवर क्लिक करा आणि तिथे मागितलेली माहिती भरा. तुमच्या जवळच्या शाखेतला एखादा कर्मचारी एकदा तुमच्या घरी चौकशीसाठी येईल. तुमच्या मुलाचे बचत खाते सुरु केले जाईल. ही दोन्ही बचत खाती मुलांसाठी ऑफलाइनदेखील उघडली जाऊ शकतात.

First published:

Tags: SBI, Sbi ATM, SBI bank