मराठी बातम्या /बातम्या /मनी /Axis Bank च्या ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदरांमध्ये केली वाढ

Axis Bank च्या ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदरांमध्ये केली वाढ

Axis Bank चे एफडी रेट वाढले

Axis Bank चे एफडी रेट वाढले

अॅक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने FD वर 0.40% व्याज वाढवले ​​आहे. जाणून घेऊया किती कालावधीच्या FD वर बँकेने किती व्याज वाढवले ​​आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 मार्च : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. अ‍ॅक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने FD वर 0.40% व्याज वाढवले ​​आहे. हे नवीन व्याजदर शुक्रवार, 10 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. अ‍ॅक्सिस बँकेने काही दिवसांपूर्वी व्याजदर वाढवले ​​होते. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने गेल्या महिन्यात रेपो दरात वाढ केल्यानंतर बहुतांश बँका त्यांच्या एफडीवरील व्याज वाढवत आहेत.

अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने 13 महिने आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 40 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.40 टक्के वाढ केली आहे. बँकेने यावरील व्याज 6.75% वरून 7.15% केले आहे. बँक 2 वर्षे ते 30 महिन्यांच्या एफडीवर सर्वात जास्त जास्त 7.26% व्याज देत आहे. जाणून घेऊया किती कालावधीच्या FD वर बँकेने किती व्याज वाढवले ​​आहे.

घर घेण्याचा प्लान करताय?होम लोनवर महिलांना बंपर सूट देताय 'या' बँका

अ‍ॅक्सिस बँक एफडी दर-

-7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी 3.50%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के

-15 दिवस ते 29 दिवस: सर्वसामान्यांसाठी 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के

-30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी 3.50%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के

-46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी 4.00%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.00 टक्के

-61 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 4.50%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.50 टक्के

-3 महिने ते 4 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.75 टक्के

-4 महिने ते 5 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.75 टक्के

-5 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.75 टक्के

-6 महिने ते 7 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.00 टक्के

-7 महिने ते 8 महिन्यांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.00 टक्के

-8 महिने ते 9 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 5.75%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.00 टक्के

-9 महिने ते 10 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 6.00%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के

-10 महिने ते 11 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 6.00%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के

-11 महिने ते 11 महिने 25 दिवसांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी 6.00%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के

-11 महिने 25 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 6.00%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के

-1 वर्ष ते 1 वर्ष 4 दिवसांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी 6.75%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के

-1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्ष 11 दिवसांपेक्षा कमी : सर्वसामान्यांसाठी 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के

-1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 24 दिवसांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के

-1 वर्ष 25 दिवस ते 13 महिन्यांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.85 टक्के

-13 महिने ते 14 महिन्यांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के

-14 महिने ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के

-15 महिने ते 16 महिन्यांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के

-16 महिने ते 17 महिन्यांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के

-17 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के

-18 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के

-2 वर्षे ते 30 महिन्यांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी 7.26 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.01 टक्के

-30 महिने ते 3 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 7.00%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के

-3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी 7.00%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के

-5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी 7.00%; ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे

8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर ते म्हणाले होते की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाचे व्याजदर वाढवणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Axis Bank, Fixed Deposit