Home /News /money /

आयकर विभागाकडून अलर्ट! पॅन-आधार लिंक न केल्यास भरावा लागणार 10 हजारांचा दंड

आयकर विभागाकडून अलर्ट! पॅन-आधार लिंक न केल्यास भरावा लागणार 10 हजारांचा दंड

तुम्ही अजून पॅन आधार लिंक केलं नाही, आधारला पॅन कार्ड कसं लिंक कराल? जाणून घ्या सविस्तर

    मुंबई, 03 मार्च : आपण अजूनही पॅन आणि आधारकार्ड लिंक केलं नसेल तर त्वरीत करून घ्या. कारण पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आपण पॅन-आधारला लिंक केलं नाही तर खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आयकर भरताना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. इनकम टॅक्स विभागानं दिलेल्या माहितीनुसार 31 तारखेनंतर जे पॅनकार्ड आधारला लिंक नसतील ते निष्क्रिय करण्यात येतील. निष्क्रिय पॅन वापरणाऱ्यांवर 10 हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सरकारने पॅन कार्ड (PAN Card) आधार (Aadhaar Card)बरोबर जोडणं अनिवार्य केलं आहे. देशभरात 30.75 कोटींहून जास्त पॅनधारक आहेत. आयकर विभागाकडून अशा नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, 31 मार्चपर्यंत जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Aadhaar Link Mandatory) नाही केलं, तर पॅन कार्ड संबंधित सर्व काम थांबवण्यात येतील आणि पॅन कार्डदेखील रद्द करण्यात येईल. कारण याआधीही आधार-पॅन लिंक करण्याची तारीख (PAN Aadhaar Link Deadline) अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे, ज्यानंतर तुमचं पॅन कार्ड अन-ऑपरेटिव्ह होईल म्हणजेच तुम्हाला पुढील 27 दिवसात हे काम पूर्ण करावंच लागेल. हे वाचा-ऑनलाईन फूडसाठी मिळणार आणखी एक पर्याय, झोमॅटो-स्वीगीला अॅमेझॉन देणार टक्कर आधार-पॅन लिंक कसं कराल? 1.आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा. 2.तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या. 3.तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल. 4.'View Link Aadhaar Status' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल 5.याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते. 6.UIDPAN<आधार क्रमांक><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल. हे वाचा-इथं मिळवा बाजार भावापेक्षा स्वस्त सोन, 6 मार्चपर्यंत असणार मोदी सरकारची विशेष यो
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Aadhar card, Income tax, Money, Pan card

    पुढील बातम्या