इथे मिळवा बाजार भावापेक्षा स्वस्त सोन, 6 मार्चपर्यंत असणार मोदी सरकारची विशेष योजना

इथे मिळवा बाजार भावापेक्षा स्वस्त सोन, 6 मार्चपर्यंत असणार मोदी सरकारची विशेष योजना

बाजार भावापेक्षा कमी किंमतीत सोन खरेदी करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. मोदी सरकराने ही योजना सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई, 03 मार्च: बाजार भावापेक्षा कमी किंमतीत सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. सॉवरन गोल्ड बॉन्ड ही योजना लॉच करण्यात आली आहे. ही योजना 6 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. बाजारात सोन्याच्या किंमती वाढत असतानाचं मोदी सरकारने ही सॉवरन गोल्ड बॉन्ड ही 10 मालिका ग्राहकांसाठी आणली आहे. या योजनेमध्ये 4,260 रूपये प्रति ग्राम सोन्याचा भाव निर्धारित करण्यात आला आहे. याच्या गुंतवणूकीमध्ये तुम्हाला व्याज देखिल मिळणार आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन खरेदीवर सरकार तुम्हाला 50 रूपयांची सूट देणार आहे. या गंतवणूकीसाठी 11 मार्चपर्यंत बॉन्ड मिळणार आहे.

किती सोनं खरदे करू शकता?

सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये गुंतवणूक करणारा व्यक्ती एका आर्थिक वर्षासाठी जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोन्याचा बॉन्ड खरेदी करू शकते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास 2.5 टक्के व्याज मिळणार आहे.

काय आहे सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना?

या योजनेची सुरूवात नोव्हेंबर 2015 मध्ये झाली. सोन्याची मागणी कमी करण हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. जर तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्ड यायोजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुमच्या टॅक्सीची बचत होणार आहे. त्यांमुळे ही गुंतवणूक तुम्हाला फायद्याची ठरणार आहे.

कुठून खरेदी कराल स्वस्त सोन?

सॉवरेन गोल्ड बॉन्डची विक्री बॅंकांमध्ये, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेश ऑफ इंडिया लिमिटेड तसचं काही ठरावीक पोस्ट ऑफिसवर होते आहे. यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेविषयी माहिती मिळवू शकता.

या योजनेचा ऑनलाईन अर्ज केल्यास या बॉन्डच्या किंमतीवर 50 रूपयांची सूट देण्यात आली आहे. या गोल्ड बॉन्डची किंमत 4,260 रूपये प्रति ग्रॅम आहे. यात जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं तर 50 रूपयांची सूट मिळणार आहे म्हणजेच याची किंमत 4,210 रूपये असणार आहे. तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे.

इतर बातम्या

पैसे काढण्यापूर्वी हे वाचा, ATM मशिनमध्ये होणार आहे मोठा बदल

ऑनलाईन फूडसाठी मिळणार आणखी एक पर्याय, झोमॅटो-स्वीगीला अॅमेझॉन देणार टक्कर

First published: March 3, 2020, 7:03 AM IST

ताज्या बातम्या