जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ही शेवटची संधी! नाहीतर भरावा लागणार 10 हजाराचा दंड, आयकर विभागाकडून अलर्ट

ही शेवटची संधी! नाहीतर भरावा लागणार 10 हजाराचा दंड, आयकर विभागाकडून अलर्ट

ही शेवटची संधी! नाहीतर भरावा लागणार 10 हजाराचा दंड, आयकर विभागाकडून अलर्ट

तुम्ही जर पॅनकार्ड लिंक केलं नसेल तर आताच करून घ्या कारण वेळ खूप कमी उरला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुम्ही अजूनही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर तुमच्यासाठी आता ही शेवटची संधी आहे. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. थेट 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचा अलर्ट आयकर विभागानेच जारी केला आहे. तुम्ही जर पॅनकार्ड लिंक केलं नसेल तर आताच करून घ्या कारण वेळ खूप कमी उरला आहे. आयकर विभागाने मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करण्याची मुदत दिली आहे. दंड भरूनच त्याचा संबंध जोडता येणार आहे. या काळात मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड अवैध मानले जाणार नाही. तोपर्यंत दंड भरून तुम्ही कधीही पॅन-आधार लिंक करू शकता. जर तुम्ही त्यांना अजून लिंक केलं नसेल, तर नक्की करा. कारण, ही शेवटची संधी आहे.

तुमचं पॅनकार्ड चोरीला गेलं तर काय करायचं? पुन्हा Pan card मिळेल का?

यानंतर पॅन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवण्यात येणार नाही. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करणं बंधनकारक असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. त्यापूर्वी लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा. ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द समजण्यात येईल आणि ते ‘निरुपयोगी’ होईल. कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा इतर कामात याचा पुन्हा वापर करता येणार नाही. 1 जुलैपासून पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी १ हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. मार्च २०२३ पर्यंत ही पेनल्टी १००० रुपये असणार आहे. मात्र त्यानंतर जर तुम्ही पॅनकार्ड आधारला लिंक करायचा प्रयत्न केला तर होणार नाही. शिवाय तुमचं पॅनकार्ड डिअॅक्टिव्हेट होईल. ते इनव्हॅलिड दाखवलं जाईल. अशा पद्धतीने करा ऑनलाइन PAN-Aadhaar लिंक 1) जर तुमचं अकाउंट तयार झालेलं नसेल तर सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करा. 2)आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फाइलिंग बेवसाईटवर जा.

तुमच्या PAN कार्डवर कोणी लोन तर घेतलं नाही? कसं चेक करायचं

3)वेबसाईटवर ‘लिंक आधार’ ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. 4)लॉगइन केल्यानंतर तुमच्या अकाउंटच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा. 5)प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिसेल. तो सिलेक्ट करा. तिथे दिलेल्या सेक्शनमध्ये आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.

News18लोकमत
News18लोकमत
  1. सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या ‘लिंक आधार’ ऑप्शनवक क्लिक करा. त्यानंतर तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात