मराठी बातम्या /बातम्या /मनी /Good News! Bank of Baroda देतेय स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी; मिळवा तुमच्या हक्काचं घर

Good News! Bank of Baroda देतेय स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी; मिळवा तुमच्या हक्काचं घर

बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घरखरेदीची (Residential Property) संधी मिळेल. BoB कडून काही मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.

बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घरखरेदीची (Residential Property) संधी मिळेल. BoB कडून काही मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.

बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घरखरेदीची (Residential Property) संधी मिळेल. BoB कडून काही मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर: स्वत:चं घर घेण्यासाठी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. तुम्ही देखील घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला बाजार भावापेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करता येईल. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda Offer) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घरखरेदीची (Residential Property at cheap cost) संधी मिळेल. BoB कडून काही मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. तुम्ही स्वस्तात घर, दुकान, फ्लॅट किंवा ऑफिस खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Mega E-Auction) 22 ऑक्टोबर रोजी मेगा ई-ऑक्शन करत आहे, ज्यात भारतातील विविध भागात मालमत्ता खरेदी करण्याची संधी आहे.

बँक ऑफ बडोदाने ट्विटरवरुन दिली माहिती

बँक ऑफ बडोदाने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. हा मेगा ई-लिलाव सरफेसी कायद्याअंतर्गत (SARFAESI Act) करण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदाकडून रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, अ‍ॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. बँक ऑफ बडोदाकडून अशा प्रॉपर्टींचा लिलाव केला जाणार आहे, ज्या डिफॉल्टच्या यादीमध्ये आल्या आहेत. तुमच्या आवडीची प्रॉपर्टी खरेदी करण्याची ही संधी असल्याचं ट्वीट बँकेने केलं आहे.

वाचा-5 रुपयांचा हा शेअर पोहोचला ₹233 वर, 1 लाखाचे कमावले 42.30 लाख

या मालमत्तांचा होतो लिलाव

ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. अशाप्रकारच्या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात.

मेगा ई-लिलावामध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांच्या सोयीची काळजी घेतली जाईल. बँक ऑफ बडोदाच्या माहितीनुसार, या सर्व मालमत्ता बँकेने मंजूर केल्या आहेत, ज्यांचे शीर्षक स्पष्ट आहे. याचा अर्थ असा की खरेदीदारांना त्यांच्या नावावर मालमत्ता हस्तांतरित करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय, खरेदीदार या सर्व मालमत्तांचा ताबा त्वरित घेऊ शकतात. बँकेच्या देखरेखीखाली कागदपत्र सहजपणे पूर्ण करता येतील. यासह, बँक ग्राहकांना मालमत्ता खरेदी करण्यासाठी सुलभ हप्त्यांवर कर्ज देखील देत आहे.

वाचा-खूशखबर! LPG गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर निश्चित Cashback, वाचा कसं कराल बुकिंग?

कुठे कराल रजिस्ट्रेशन?

बँक ऑफ बडोदाच्या मेगा ई-ऑक्शनमध्ये इच्छूक बिडरला e Bkray पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. बिडर्स रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर बिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल.

KYC डॉक्यूमेंट्सची आवश्यकता

बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो.

First published:

Tags: Bank details, Home Loan, बँक