जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Certificate : डोमिसाइल सर्टिफिकेट हवंय? या सोप्या स्टेप्सने मिळेल प्रमाणपत्र

Certificate : डोमिसाइल सर्टिफिकेट हवंय? या सोप्या स्टेप्सने मिळेल प्रमाणपत्र

डोमासाइल सर्टिफिकेट

डोमासाइल सर्टिफिकेट

शैक्षणिक कामांसोबतच अनेक महत्त्वाच्या कामांसाठी डोमिसाइल सर्टिफिकेच आवश्यक असतं. मात्र हे कसं काढावं हे अनेकांना माहीत नसतं. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 जून : आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत हे सिद्ध करण्यासाठी एक प्रमाणपत्र द्यावं लागतं. ज्याला डोमिसाइल सर्टिफिकेट असं म्हणतात. याला वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र असं देखील म्हणतात. नुकताच दहावी बारावीचा निकाल लागलाय. अशा वेळी शैक्षणिक प्रवेशासाठी, पासपोर्टसाठी किंवा सरकारी नोकरीसाठी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी देखील हे प्रमाणपत्र आवश्यक मानलं जातं. यापूर्वी कोर्टामध्ये हे प्रमाणपत्र दिलं जात होतं. मात्र आता जिल्हाधिकारी कार्यकक्षेमध्ये ऑफलाइन किंवा ऑनलाइन हे पत्रमाणपत्र सहज मिळतं.

News18लोकमत
News18लोकमत

हे प्रमाणपत्र कुठे मिळतं यापूर्वी डोमिसाइल प्रमाणपत्र हे मुंबई कोर्टामध्ये दिलं जात होतं. हे मिळवण्यासाठी अनेक कागदपत्र गोळा करावी लागायची. मग कोर्टाच्या कामांमुळे हे मिळण्यास उशीरही व्हायचा. मात्र आता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सेतू कार्यालयात, महा ई-सेवा केंद्रात आपले सरकारी वेबसाइवर ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीही पद्धतीने हे उपलब्ध होतं. सेतूवरुन हे सर्टिफिकेट कसं काढायचं? सेतू केंद्रावरुन सर्टिफिकेट काढायचं असेल तर काय प्रक्रिया आहे ते आपण पाहूया. कोर्ट फी स्टॅम्प अर्जाच्या छापील प्रत काढून त्याच्यावर चिटवा. यामध्ये जन्म तारीख आणि जन्म ठिकाणाचा पुरावा, जन्म महाराष्ट्राच्या बाहेरील असेल तर सलग 10 वर्षांपासून तिथे राहत असल्याचा पुरावा. मुळ राज्याचा अधिवास स्वशुखीने सोडणे आणि महाराष्ट्राचा अधिवास स्वीकारत असल्याचे प्रतिज्ञापत्र, अर्जदाराचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर वडिलांचे/ पालकांचे अधिवास प्रमाणपत्रांची प्रत येथे जोडून अर्ज करावा लागतो. काय सांगता! फक्त 3 महिने काम करुन कोट्याधीश बनतात लोक, नेमकं काम तरी काय? ऑनलाइन कसा भरायचा अर्ज? आपले सरकार या वेबसाइवर ऑनलाइन डोमिसाइल सर्टिफिकेट मिळण्याची सुविधा मिळते. त्यानुसार डोमिसाइल सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येतो. aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटवर अर्जदाराला आपलं लॉगइन आयडी, तिथे मागितलेली आवश्यक माहिती, डॉक्यूमेंट आणि फिस भरावी लागेल. महा ई-सेवा केंद्रावरुन कसा मिळवायचं सर्टिफिकेट? अनेक ठिकाणी महा ई सेवा केंद्र असतात. या केंद्रांची माहिती महाऑनलाइनच्या वेबसाइटव दिली आहे. त्या केंद्रांवर आवश्यक ते डॉक्यूमेंटच्या मदतीने आणि अर्जदाराची माहिती भरलेल्या पूर्ण अर्जाच्या साहय्याने हा अर्ज करता येऊ शकतो. Property Rule : फक्त रजिस्ट्री केल्याने घर-जमिनीचे मालक होत नाही, ‘हे’ डॉक्यूमेंट देतात मालकी हक्क! आवश्यक कागदपत्र कोणती? ओळखीसाठी - पॅनकार्ड, पासपोर्ट, वीजबील, मोबाईल बील, रेशन कार्ड , भाडेपावती, मालमत्ता कर पावती, मालमत्ता नोंदणी उतारा, 7/12 आणि 8अ उतारा. वयासाठी - बर्थ सर्टिफिकेट, बोनाफाईड सर्टिफिकेट, शाळेची टीसी, वडिलांचं अधिवास प्रमाणपत्र रहिवासाचा पुरावा - ग्रामसोवक, तलाठी किंवा जिल्ह्याधिकारी रहिवासी दाखला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात