जाहिरात
मराठी बातम्या / मनी / काय सांगता! फक्त 3 महिने काम करुन कोट्याधीश बनतात लोक, नेमकं काम तरी काय?

काय सांगता! फक्त 3 महिने काम करुन कोट्याधीश बनतात लोक, नेमकं काम तरी काय?

अजब जॉब

अजब जॉब

High Paying Jobs: जगात असे अनेक काम असतात. जे आपल्याला विचित्र वाटतात. मात्र ही कामं करणारी लोक बक्कळ पैसा कमावतात. आज आपण अशाच एका कामाविषयी जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जून : प्रत्येकाला असं वाटतं की, त्यांना खूप पैसा कमावावा. मात्र आपण ज्या कामातून पैसे कमावतो ते कामं सोपं असावं अशीही इच्छा असते. मात्र अनेकांची ही इच्छा पूर्ण होत नाही. कारण चांगला पगार घेणाऱ्या लोकांवर तेवढ्याच जबाबदाऱ्या देखील असतात. मात्र जगात अशी अनेक कामं आहेत. ज्यामध्ये मेहनत कमी आणि पैसा खूप आहे. काही अनोखे काम आहेत ज्याविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही. असच एक काम म्हणजेच घोड्याच्या केसांची कटींग करणे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, काही देशांमध्ये हे कामं करणारे ट्रेंड लोक एका घोड्याच्या कटिंगचे 12,000 रुपये देखील घेतात. डेली मेलच्या एका बातमीनुसार, दुबई, सौदी अरेबिया, कतार, इराण आणि कुवेत सारख्या देशांमध्ये प्रोफेशनल हॉर्स ग्रूमर्सची मोठी मागणी आहे. घोड्यांना सुंदर बनवण्यासाठी, त्यांचे केस योग्य प्रकारे कापले जातात. प्रत्येकजण हे काम करत नाही. घोड्याच्या हेयर ड्रेसर म्हणून काम करणाऱ्यांची कमतरता आहे. याच कारणामुळे काही देशांमध्ये घोड्याचे केस कापण्यासाठी 150 डॉलर प्रति तास मिळतात. घोड्याचे केस कापून त्याला अप्रतिम लुक देण्यासाठी फक्त एक तास लागतो. ट्रेंड हेअर ड्रेसर दिवसाला 10 घोड्यांचे केस कापतो. अशा प्रकारे तो एका दिवसात 1.20 लाख रुपयांपर्यंत कमावतो.

Business Idea: 25 रुपयांचे होतील शेडको रुपये! फक्त हजार रुपयात घरीच सुरु करा हा बिझनेस, सरकारही करेल मदत!

 इतके पैसे कशाला? अनेक देशांमध्ये चांगले घोडे असणे ही अभिमानाची बाब आहे. दुबई, सौदी अरेबिया, कतार, इराण आणि कुवेतसह अनेक देशांमध्ये घोड्यांच्या शर्यती आणि हॉर्स शोज होतात. घोड्याच्या शोमध्ये, घोड्याची उंची आणि ताकद सोबत, त्याचे सौंदर्य देखील त्यांना जिंकण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच घोडे सजवले जातात. घोड्याच्या केसांना देखील एक सुंदर आकार दिला जातो. विशेषतः शेपटी आणि मानेचे केस. नीटनेटके कापलेले केस घोड्याच्या सौंदर्यात भर घालतात. म्हणूनच ट्रेंड हॉर्स हेअर ड्रेसर्स रोज लाखो रुपये कमावतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात