नवी दिल्ली, 16 मे: तुम्ही ट्रेनमध्ये तिकीटाशिवाय प्रवास करू शकत नाही. असं केल्यास तुम्हाला जेल, दंड किंवा दोन्हीही भोगावं लागू शकतं. अनेकदा कन्फर्म तिकीट मिळूनही आपल्याकडे तिकीटच नाही अशी वेळ येते. कारण कधीकधी तिकीट अचानक कुठेतरी हरवते. अशा वेळी नेमकं काय होईल? तुम्ही नवीन तिकीट खरेदी करायला गेलात तर तुम्हाला कन्फर्म सीट मिळेलच असे नाही. पण यावर उपाय काय? तर यावर उपाय आहे. ट्रेन पकडण्यापूर्वी तुमचे तिकीट कुठेही हरवले तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. अशा परिस्थितीसाठी रेल्वे डुप्लिकेट तिकीट जारी करते.
विविध श्रेणीचे डुप्लिकेट तिकिटे बनवण्याचे नियम आणि फीसमध्ये अंतर आहे. यासाठी प्रवासी तिकीट चेकरसोबत संपर्क साधू शकतात. तसेच तिकीट काउंटरवर जाऊन डुप्लिकेट तिकीट बनवता येऊ शकतं. डुप्लिकेट तिकीट काढण्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील. किती पैसे आकारले जातील हे श्रेणी आणि तुम्हाला तिकीट केव्हा मिळेल यावर अवलंबून असेल.
रेल्वेसोबत मिळून सुरु करा बिझनेस, कधीच कमी होणार नाही ग्राहकांच्या रांगापैसे द्यावे लागतील का?
याविषयीची सविस्तर माहिती indianrail.gov.in वर देण्यात आली आहे. तुम्हाला थर्ड आणि स्लीपर क्लासचे डुप्लिकेट तिकीट 50 रुपयांमध्ये मिळेल. या वरील श्रेणीसाठी, तुम्हाला 100 रुपये दंड भरावा लागेल. रिझर्वेशन चार्ट तयार केल्यानंतर कन्फर्म केलेले तिकीट हरवले असेल, तर तुम्हाला भाड्याच्या 50% रक्कम भरावी लागेल. तिकीट फाटले तरी डुप्लिकेट तिकीट काढता येते. यासाठी तुम्हाला 25 टक्के भाडे भरावे लागेल. वेटिंग तिकिटासाठी डुप्लिकेट तिकीट तयार केलं जातं नाही.
देशाच्या ‘या’ वेगवेगळ्या रुटवर धावतेय वंदे भारत ट्रेन, पाहा तुम्हीही प्रवास करु शकता का?हरवलेले तिकीट मिळाले तर काय?
तुम्हाला तुमचे हरवलेले तिकीट सापडल्यास, तुम्ही दोन्ही तिकिटे काउंटरवर दाखवू शकता आणि डुप्लिकेट तिकिटासाठी दिलेले पैसे परत घेऊ शकता. बातम्यांनुसार, टीटीई ट्रेनमध्ये येण्यापूर्वी तुमचं तिकीट हरवलं असेल, तर तुमच्यासोबत ठेवलेला कोणताही आयडी प्रूफ तिकीट चेकरला दाखवा. त्यांच्याकडे कंफर्म सीट असलेल्यांच्या नावांची यादी असते. तुमचे नाव मॅच झाले तर तिकीट चेकर तुम्हाला एक स्लिप देईल जेणेकरून तुम्हाला आरामात प्रवास करता येईल.