यावेळी ITR फॉर्ममध्ये सर्वात मोठा बदल डिजिटल कमाईच्या बाबतीत झाला आहे. 1 एप्रिल 2022 पासून व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDAs) मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर कपात सुरू झाली आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सी आणि एनएफटीचा समावेश आहे. VDA मधून मिळालेल्या कमाईचे डिटेल्सही रिटर्न फॉर्ममध्ये द्यावे लागतील. यासोबतच हे इन्कम बिझनेसमधून झाले आहे की, कॅपिटल गेनच्या रुपात हे देखील सांगावं लागेल.
करदात्याने त्याचा टॅक्स वाचवण्यासाठी दान केले, तर त्याला 80G अंतर्गत क्लेम करण्यासाठी त्याच्या ITR मध्ये डोनेशन रेफरेंस नंबर (ARN) देखील भरावा लागेल. जर ही देणगी एखाद्या संस्थेला दिली गेली असेल, तर त्यात विहित मर्यादेच्या 50 टक्क्यांपर्यंत डिडक्शन दिलं जातं. ARN हा एक यूनिक रेफरेंस नंबर आहे, जो फॉर्म 10BE किंवा दान पावतीवर लिहिलेला असतो.
टॅक्सपेयर्सला त्यांच्या स्त्रोतावर टॅक्स वसूलीच्या रुपात कट केलेल्या रकमेला कर दायित्वासह अॅडजस्ट करण्याची सुविधाही दिली जाईल. तसेच, जर करदात्याने कलम 89A अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेतला असेल आणि नंतर तो अनिवासी भारतीय झाला असेल, तर त्याला सूट दरम्यान त्याचे करपात्र उत्पन्न देखील घोषित करावे लागेल.
करदात्याने फॉरेन रिटायरमेंट बेनिफिट अकाउंटमधून कमाई केली तर त्याला 89A अंतर्गत कर सूट दिली जाते. जोपर्यंत रक्कम काढली जात नाही तोपर्यंत ही सवलत दिली जाते. जे करदाता याचा फायदा घेतात, त्यांना आयटीआर फॉर्ममध्ये त्यांच्या पगाराची माहिती द्यावी लागेल.
शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या करदात्यांनाही या फॉर्ममध्ये अधिक डिटेल्स द्यावे लागतील. यावेळी ITR फॉर्ममध्ये ट्रेडिंग अकाउंट नावाचा नवीन सेक्शन जोडला गेला आहे. यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या करदात्यांना उत्पन्न आणि टर्नओवर जाहीर करावं लागेल.