मराठी बातम्या /बातम्या /मनी /म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी? गुंतवणुकीआधी नेमकं काय करावं?

म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी? गुंतवणुकीआधी नेमकं काय करावं?

Mutual Fund ची निवड करताना सर्वांत आधी आपली आर्थिक उद्दिष्टे (Financial Goals) निश्चित असणं महत्त्वाचं आहे. आपल्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड उपयुक्त ठरू शकतात.

Mutual Fund ची निवड करताना सर्वांत आधी आपली आर्थिक उद्दिष्टे (Financial Goals) निश्चित असणं महत्त्वाचं आहे. आपल्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड उपयुक्त ठरू शकतात.

Mutual Fund ची निवड करताना सर्वांत आधी आपली आर्थिक उद्दिष्टे (Financial Goals) निश्चित असणं महत्त्वाचं आहे. आपल्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड उपयुक्त ठरू शकतात.

मुंबई, 25 नोव्हेंबर : भविष्यातील आर्थिक तरतूद करण्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणुकीचा (Investment) उत्तम पर्याय असल्याचं आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे बहुतांश गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीतील मोठा हिस्सा म्युच्युअल फंडात गुंतवत असतात. दिवसेंदिवस म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र अनेकदा कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतो. आज बाजारात अनेक कंपन्यांचे नानाविध प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. त्यामुळे त्याचे प्रकार, परतावा, कालावधी यासह अन्य विविध बाबींचा अगदी सखोल अभ्यास करून मग गुंतवणुकीचा निर्णय घेणं प्रत्येकाला शक्य नसतं. त्यामुळे बहुतांश सर्वसामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करताना आपल्या ओळखीचे लोक, नातेवाईक यांनी सुचवलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यामुळे अनेकदा अपेक्षित फायदा होत नाही आणि गुंतवणूकदार यापासून दूर जातात. थोडीशी काळजी आणि थोडासा अभ्यास करून म्युच्युअल फंडाची निवड केल्यास असं नुकसान टाळता येतं आणि चांगला फायदा मिळवता येतो. याकरिता खालील काही मुद्दे उपयुक्त ठरू शकतात.

म्युच्युअल फंडाची निवड करताना सर्वांत आधी आपली आर्थिक उद्दिष्टे (Financial Goals) निश्चित असणं महत्त्वाचं आहे. आपल्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड उपयुक्त ठरू शकतात. अगदी अल्पकालीन आणि दीर्घकालीनही. त्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी गुंतवणूक करायची आहे हे नक्की असणं आवश्यक असतं. बहुतांश लोक मुलांचं शिक्षण, निवृत्तीनंतर दरमहा ठराविक उत्पन्न मिळणं, मुलांची लग्नकार्ये, आजारपण, परदेश प्रवास अशा गोष्टींसाठी गुंतवणूक करतात.

Mutual Fund म्हणजे काय? जाणून घ्या म्युच्युअल फंडाविषयी महत्त्वाचं

मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी हवा असेल तर त्यासाठी मूल लहान असतानाच गुंतवणूक सुरू केली तर दीर्घकाळ गुंतवणूक करता येते. अशावेळी दीर्घ मुदतीच्या फंडाची निवड योग्य ठरते. आपल्याला अल्प मुदतीसाठी पैसे गुंतवायचे असतील तर तीन वर्षांच्या मुदतीच्या शॉर्ट टर्म डेट फंडाची निवड करणं फायद्याचं ठरतं. आपलं जे उद्दिष्ट आहे त्यानुसार गुंतवणूकीचे मुबलक पर्याय यात उपलब्ध आहेत. तुम्हाला अगदी कमी काळात म्हणजे 2-3 वर्षांत मोठ्या रकमेची गरज असेल तर शॉर्ट टर्म टार्गेट, मध्यम अवधीसाठी म्हणजे 5 ते 7 वर्षांत रक्कम लागणार असेल तर मिड टर्म आणि त्याहून अधिक कालावधीसाठी म्हणजे 10 ते 15, 20 वर्षांनी रक्कम हवी असेल तर लॉंग टर्म टार्गेटनुसार योजनांची निवड करता येते. आपल्याला कधी आणि किती रक्कम हवी आहे, याची स्पष्टता असणं आवश्यक असतं. म्युच्युअल फंडाची लार्ज कॅप फंड, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप आणि ईएलएसएस अशा पाच वर्गांत विभागणी केली जाते.

त्याचबरोबर म्युच्युअल फंडाची निवड करताना आपण एखादी योजना निवडली तर त्याचा गेल्या काही वर्षांतील परतावा (Returns) तपासणं महत्त्वाचं आहे. तसंच त्या योजनेतील अटी, नियम (Rules and Regulations) याची माहिती घेणंही आवश्यक आहे. म्युच्युअल फंड हे शेअर बाजाराशी (Share Market) निगडित असतात. त्यामुळे त्याच्या कामगिरीत चढ-उतार होत असतात. काही फंड शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करणारे असतात, त्यात परतावा चांगला असतो पण जोखीमही अधिक असते. उदाहरणार्थ, इक्विटी फंड्स. यामध्ये जोखीम अधिक असते. त्यामुळे अशा फंडाची निवड केल्यास त्यातील जोखीम किती आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. यासाठी फंड हाउसेसनीही ऑनलाइन सल्ला सेवा उपलब्ध केली आहे.

Explainer : चांगल्या क्रिप्टोकरन्सीचे गुणधर्म कोणते?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना वैविध्यपूर्ण योजनांची निवड करणं आवश्यक आहे. त्यामुळे गुंतवणुकीतील जोखीम कमी होते. त्यात संतुलन साधलं जातं. त्यामुळे निवड करताना काही फंड अधिक जोखीम असणारे परंतु, अधिक परतावा देणारे असतील तर काही फंड कमी जोखमीचे निवडणं आवश्यक आहे. अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी अॅसेट अॅलोकेशन योजना (Asset Allocation Plans) आणल्या आहेत. या योजना जोखीम व्यवस्थापन उत्तम रीतीने करून चांगले रिटर्न्स देतात. या योजनांमध्ये इक्विटीप्रमाणे शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक केली जात नाही, मात्र तरीही याचा परतावा चांगला मिळतो.

एकरकमी गुंतवणूक करणार की एसआयपीद्वारे यादृष्टीनेही म्युच्युअल फंडाची निवड करताना विचार करणं आवश्यक आहे. कर बचतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर एकरकमी गुंतवणूक योजना उपयुक्त ठरतात. इतर वेळी एसआयपी द्वारे दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा पर्याय लाभदायी ठरतो.

ATM कार्डची मुदत संपल्यानंतर तुम्हाला नवं कार्ड मिळालं नाही तर काय करायचं?

म्युच्युअल फंडाची निवड करताना मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागाराची (Financial Planner) मदत घेणंदेखील लाभदायी ठरतं. आजकाल अनेक कंपन्या किंवा वैयक्तिकरीत्या तज्ज्ञ सल्लागार सेवा देतात. त्यामुळे त्यांना आपल्या अपेक्षा, गरजा, कालावधी, उत्पन्न, गुंतवणुकीची क्षमता, जोखीम घेण्याची क्षमता याची माहिती देऊन त्यानुसार योग्य म्युच्युअल फंडाची निवड करता येते.

तेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी कोणता फंड योग्य ठरेल हे ठरवण्यासाठी आधी आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा. आपल्या गरजा, गुंतवणुकीची क्षमता, कालावधी याचा विचार करून आपल्याला सोयीची ठरेल अशी योजना निवडा. गरज भासल्यास मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. योग्य फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक परतावा मिळेल आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य होतील.

First published:

Tags: Investment, Mutual Funds