सोशल मीडियावर कपड्यांपासून विविध वस्तूंची खोटी दावे करून विक्री केली जात आहे. 60 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आयफोन केवळ 5000 रुपयांमध्ये मिळतील असं सांगितलंय जातंय.
त्याचबरोबर मोबाईलपासून ते कपड्यांपर्यंत छोट्या-छोट्या जीवनावश्यक वस्तूही अत्यंत कमी किमतीत दिल्या जात आहेत. तुम्हीही हे साहित्य विकत घेत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता.
बनावट वेबसाइट ग्राहकांना त्यांची लिंक पाठवतात आणि त्यांना खरेदी करण्यास सांगतात. मात्र त्या लिंकवर क्लिक केल्यास, त्यात प्रोडक्ट किंवा इतर काहीही दिसत नाही.
काही दिवसांनी ती वेबसाइट गायब होते. मात्र ही वेबसाइट तुमची माहिती चोरु शकते. तुमच्यासोबत फसवणूक होण्याचा धोका वाढतो.
या प्रकरणात, तुम्ही ते तपासून घेतलं पाहिजे. कोणती वेबसाइट खरी आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही स्कॅम अॅडव्हायजर वेबसाइटची मदत घेऊ शकता.
ज्या वेबसाइटची तपासणी करायची आहे तिचे नाव टाकून तपासू शकता. तुम्हाला संपूर्ण माहिती समोर येईल. जर सर्व काही लाल रंगात असेल तर ती बनावट वेबसाइट असू शकते. जर ते हिरव्या रंगात असेल तर ही वेबसाइट खरी असू शकते.