जाहिरात
मराठी बातम्या / मनी / मेलचा पासवर्ड पुन्हापुन्हा विसरता का? पाहा हा Viral Video, अवश्य मिळेल फायदा

मेलचा पासवर्ड पुन्हापुन्हा विसरता का? पाहा हा Viral Video, अवश्य मिळेल फायदा

जीमेलचा पासवर्ड कसा शोधायचा

जीमेलचा पासवर्ड कसा शोधायचा

आपल्यापैकी अनेकांना मेलचा पासवर्ड विसरण्याची सवय असते, अशा लोकांसाठी सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो पाहून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 मे : आजकाल जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी पासवर्ड गरजेचा असतो. अशा वेळी, एवढे पासवर्ड झालेले असतात की, काय काय लक्षात ठेवावं हे कळत नाही. मग अचानक एखाद्या दिवशी आपण पासवर्डच विसरुन जातो. मग नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी बराच वेळ जातो. आज आम्ही तुम्हाला यावर उपाय सांगणारा व्हिडिओ दाखवत आहोत, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच मदत होईल.

News18लोकमत
News18लोकमत

कॉम्प्युटरपासून मोबाइलपर्यंत पासवर्ड आपली काही पाठ सोडत नाही. मग काय अनेक पासवर्ड लक्षात ठेवून आपण गोंधळून जातो. अशा स्थितीत या व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितलेली गोष्ट तुमच्या कामी येईल. हा व्हिडिओ आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे. यामध्ये सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्यावर तुम्ही सहज तुमचा पासवर्ड मिळवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घेण्याचीही गरज नाही.

तुम्हाला 25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवा फोन घ्यायचायं? हे आहेत बेस्ट फोन्स

तुम्ही Gmail पासवर्ड विसरलात तर काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या समस्येवर उपाय सांगितला जात आहे. ज्याचा सामना आपल्यापैकी 70 टक्के लोकांना करावा लागत असतो. आपण अनेकदा आपल्या मेलचा पासवर्ड विसरतो. अशा वेळी, तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेली स्टेप फॉलो करु शकता. तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या जीमेलचा पासवर्ड मिळू शकतो. यामधून तुम्ही जीमेल, इन्स्टाग्राम, फेसबुकसह त्या प्लॅटफॉर्मचा पासवर्ड कुठून मिळवू शकता, जे तुम्ही फोनमध्ये वापरले आहेत. या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतींनी पासवर्ड कसा चेक करायचा हे समजावून सांगितलं आहे.

जाहिरात

आपल्यापैकी बरेच जण या समस्येचा सामना करत असतात. यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरु शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gmail , password
  • First Published :
जाहिरात
जाहिरात