नवी दिल्ली, 13 मार्च : सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क आवश्यक आहे. परंतु सरकारने अशा ग्राहकांना दिलासा दिला आहे, ज्यांच्याकडे बीआयएससह (Bureau of Indian Standard-BIS) शुद्ध सोन्याचे दागिने नाहीत. आता अशा ग्राहकांना दागिन्यांची शुद्धता तपासणी करता येईल. त्यासाठी त्यांना काही शुल्क भरावं लागेल. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक त्यांचे हॉलमार्क (Hallmark) नसलेले सोन्याचे दागिने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सकडून (BIS) मान्यताप्राप्त सुविधा केंद्रात सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासू शकतात. चार सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धता तपासण्यासाठी 200 रुपये शुल्क भरावं लागेल. पाच किंवा त्याहून अधिक दागिन्यांसाठी 45 रुपये प्रति युनिट शुल्क आहे.
हे वाचा - UPI पेमेंट 15 मार्चपासून आणखी सोपं, Aadhaar OTP ने अॅक्टिव्हेट करता येणार यूपीआय
कुठे करता येईल चाचणी? ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (The Ministry of Consumer Affairs) सांगितलं, की आवश्यक हॉलमार्किंग यशस्वीरित्या लागू करण्यात आलं आहे. यात दररोज तीन लाख सोन्याच्या वस्तूंना HUID (Hallmark Unique Identification) प्रमाणित केलं जातं. BSI ने सामान्य ग्राहकांसाठी एक तरतूद केली आहे. ग्राहकांना विना हॉलमार्क सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी BSI मान्यता असलेल्या कोणत्याही हॉलमार्किंग केंद्रांवर (Assaying and Hallmarking Centres-ACH) परवानगी दिली जाईल. Assaying and Hallmarking Centres च्या आधारे ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांची चाचणी करुन मिळेल. त्यानंतर त्यांना अचूकता अहवाल देण्यात येईल. या अहवालामुळे ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांच्या शुद्धतेबद्दल खात्री होईल. तसंच ग्राहकाला दागिने विकायचे असल्यास हा अहवाल फायदेशीर ठरेल.
हे वाचा - PF Interest : नोकरी करणाऱ्यांना मोठा झटका! PF व्याजदरात कपात
कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रार करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तात्काळ माहितीही मिळेल.

)







