मराठी बातम्या /बातम्या /मनी /PF Interest : नोकरी करणाऱ्यांना मोठा झटका! PF व्याजदरात कपात

PF Interest : नोकरी करणाऱ्यांना मोठा झटका! PF व्याजदरात कपात

PF व्याजदरात मागील दोन वर्षात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पहिल्यादा आर्थिक वईष 2019-20 मध्ये व्याजदरात कपात करुने ते 8.5 ट्क्के करण्यात आले होते.

PF व्याजदरात मागील दोन वर्षात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पहिल्यादा आर्थिक वईष 2019-20 मध्ये व्याजदरात कपात करुने ते 8.5 ट्क्के करण्यात आले होते.

PF व्याजदरात मागील दोन वर्षात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पहिल्यादा आर्थिक वईष 2019-20 मध्ये व्याजदरात कपात करुने ते 8.5 ट्क्के करण्यात आले होते.

मुंबई, 12 मार्च : ईपीएफओ (EPFO) अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेने शनिवारी पीएफवर मिळणारे व्याज (Provident Fund Interest Rate) निश्चित केले आहे. मात्र, यावेळी हे व्याज गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी असल्याने पगारदारांना मोठा झटका बसला आहे. EPFO ने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. गेल्या 10 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ईपीएफओच्या सुमारे सहा कोटी लोकांना धक्का बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळत होते.

पीएफ व्याजदारबाबत गुवाहाटी येथे ईपीएफओ सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची दोन दिवस बैठक सुरु होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची देशातील आर्थिक स्थिती आणि रशिया युक्रेन युद्धाचे भारतावरील परिणाम यामुळे ईपीएफओ व्याजदरात कपात केली असल्याचं बोललं जात आहे.

मागील दोन वर्षात व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पहिल्यादा आर्थिक वईष 2019-20 मध्ये व्याजदरात कपात करुने ते 8.5 ट्क्के करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये त्यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

Reak Estateमध्ये ट्रेंड बदलतोय! रिसेलपेक्षा नवं घर घेण्यावर भर; काय होणार परिणाम

एकीकडे महागाई सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, सरकारने पीएफवरील व्याज कमी केले आहे. 1977-78 या आर्थिक वर्षात EPFO ​​ने 8 टक्के व्याजदर निश्चित केला होता. त्यानंतर आता इतके कमी व्याज मिळत आहे. आत्तापर्यंत 8.25 टक्के किंवा त्याहून अधिक व्याज दिले गेले आहे.

Share Market : शेअर बाजाराची चाल पुढील आठवड्यात कशी असेल? कोणते फॅक्टर्स ठरतील महत्त्वाचे

यापूर्वी किती व्याज मिळाले होते?

रिटायरमेंट फंड बॉडी EPFO ​​ने 2019-2020 या आर्थिक वर्षात 8.5 टक्के व्याज दिले होते. त्यानंतर 2020-2021 या आर्थिक वर्षातही 8.5 टक्के व्याज मिळाले. तर 2018-19 मध्ये EPFO ​​ने 8.65 टक्के व्याज दिले होते. 2017-18 या आर्थिक वर्षात 8.55 टक्के व्याज मिळाले. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8.65 टक्के व्याज मिळाले होते तर 2015-16 या आर्थिक वर्षात 8.8 टक्के व्याज मिळाले होते.

First published:

Tags: Epfo news, PF Amount