Home /News /money /

UPI पेमेंट 15 मार्चपासून आणखी सोपं, Aadhaar OTP ने अ‍ॅक्टिव्हेट करता येणार यूपीआय

UPI पेमेंट 15 मार्चपासून आणखी सोपं, Aadhaar OTP ने अ‍ॅक्टिव्हेट करता येणार यूपीआय

आता UPI सेवा अॅक्टिव्ह करणे सोपे होणार आहे. आता 15 मार्च 2022 पासून, बँक खातेदारांना UPI सेवा अॅक्टिव्ह करण्यासाठी डेबिट कार्डऐवजी आधार आणि OTP वापरण्याचा पर्याय देखील असेल. या व्यवस्थेअंतर्गत बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 मार्च : डिजिटल पेमेंटसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारखी सुविधा तुम्हाला घरबसल्या सहजपणे पैसे ट्रान्सफर करू देते. यासाठी तुम्हाला Paytm, Phonepay, Bhim, Google Pay इत्यादी सारख्या UPI सपोर्टिंग अॅप्सची आवश्यकता आहे. विशेष बाब म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी अशी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू देते. आता UPI सेवा अॅक्टिव्ह करणे सोपे होणार आहे. आता 15 मार्च 2022 पासून, बँक खातेदारांना UPI सेवा अॅक्टिव्ह करण्यासाठी डेबिट कार्डऐवजी आधार आणि OTP वापरण्याचा पर्याय देखील असेल. या व्यवस्थेअंतर्गत बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे फीचर पहिल्यांदा सप्टेंबर 2021 मध्ये सादर केले. NPCI ने परिपत्रक जारी केले होते आणि बँकांना 15 डिसेंबर 2021 पर्यंत परिपत्रकाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले होते, जे नंतर 15 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आले. High Return Stock: शेअर बाजारात 'या' स्टॉक्समुळे गुंतवणूकदारांची बंपर कमाई, पाच दिवसात 40 टक्क्यांपर्यंत परतावा तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक केलेले आहे? तुमचे आधार कार्ड तुमच्या कोणत्याही बँक खात्याशी लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी बँक किंवा आधार कार्ड केंद्रावर जाण्याची गरज नाही. आपण खाली दिलेल्या मार्गाने सहजपणे ते शोधू शकता. Share Market : शेअर बाजाराची चाल पुढील आठवड्यात कशी असेल? कोणते फॅक्टर्स ठरतील महत्त्वाचे >> सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा. >> येथे Check Your Aadhaar and Bank Account तपासा या लिंकवर क्लिक करा. >> येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल. >> आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. >> UIDAI वेबसाइटवर हा OTP टाका. >> येथे तुम्हाला login चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. >> तुम्ही लॉग इन करताच तुमच्या आधारशी लिंक केलेल्या सर्व बँक खात्यांचे तपशील समोर येतील.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Online payments, Upi

    पुढील बातम्या