मराठी बातम्या /बातम्या /मनी /LIC पॉलिसीमध्ये नॉमिनी बदलायचाय? ही आहे सोपी ट्रिक

LIC पॉलिसीमध्ये नॉमिनी बदलायचाय? ही आहे सोपी ट्रिक

एलआयसी नॉमिनी कसा चेंज करावा?

एलआयसी नॉमिनी कसा चेंज करावा?

देशभरात एलआयसीचे कोट्यवधी ग्राहक आहे. या ग्राहकांना एलआसयी पूर्ण सुविधा प्रदान करते. पॉलिसीधारकांना आवश्यकतेनुसार नॉमिनी बदलण्याची सुविधा देते. या सोप्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 5 फेब्रुवारी: भारतीय आयुर्विमा महामंडळाचे म्हणजेच LIC चे देशभरात कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत पॉलिसीच्या नॉमिनीला विम्याच्या डेथ क्लेमचा लाभ मिळतो. जेव्हा एखादी व्यक्ती एलआयसी पॉलिसी खरेदी करते तेव्हा नॉमिनीचे नाव टाकणे आवश्यक असते. परंतु अनेक वेळा नॉमिनीचे नाव नोंदवल्यानंतर त्या नॉमिनीचे नाव बदलावे लागते. अशा स्थितीत एकदा नॉमिनीमध्ये टाकल्यानंतर त्यात बदल करता येईल का, असा प्रश्न पडतो. तर याचे उत्तर हे होय आहे. एकदा तुम्ही नॉमिनी व्यक्तीचे नाव टाकल्यानंतर ते बदलू शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कितीही वेळा ते नाव बदलू शकता. यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

नॉमिनी का बदलावा लागतो?

अनेकदा लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एलआयसी पॉलिसीचे नॉमिनी बनवतात. अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की त्यांना नॉमिनी बदलावा लागतो. अनेकदा पॉलिसीधारकाने ज्या व्यक्तीला नॉमिनी केले आहे त्याचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत, एलआयसी पॉलिसीधारक नॉमिनीमध्ये बदल करू शकतात. जर तुम्हाला तुमच्या पॉलिसीमध्ये चेंज करायचा असेल तर आम्ही तुम्हाला ते कसे बदलता येईल याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

नॉमिनी बदलण्याची प्रोसेस काय?

इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर, मॅच्युरिटी होईपर्यंत तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही नॉमिनी बदलू शकता. यासाठी, तुम्हाला सध्याच्या नॉमिनीला कळवणे आवश्यक नाही. यासाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तेथून नॉमिनी बदलाचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. यानंतर, ज्या व्यक्तीला नॉमिनी करायचे आहे त्याच्या माहितीचा आणि नातेसंबंधाचा पुरावा द्या. याशिवाय, तुम्ही एलआयसीच्या शाखेत जाऊन नॉमिनीचे नाव बदलू शकता.

नाव बदलण्यासाठी हे डॉक्यूमेंट्स आवश्यक आहेत

-पॉलिसी बाँड

-पॉलिसीधारक आणि नॉमिनी यांच्यातील संबंध प्रमाणपत्र

-आधार कार्ड

-पॅन कार्ड

First published:

Tags: LIC, Policy, Policy plans