Home /News /money /

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचे! डेबिट कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास 'या' 4 पद्धतीनी करा ब्लॉक

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचे! डेबिट कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास 'या' 4 पद्धतीनी करा ब्लॉक

तुमचं डेबिट कार्ड (Debit Card lost) हरवलं किंवा चोरीला गेलं असेल तर ते लवकरात लवकर ब्लॉक करणं आवश्यक (How to block debit Card) असतं. काही वेळा तर कार्ड तुमच्याकडे असतानाही कार्डशिवाय ट्रान्झॅक्शन होतात, अशा परिस्थितीतसुद्धा कार्ड ताबडतोब ब्लॉक केलं पाहिजे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी: तुमचं डेबिट कार्ड (Debit Card lost) हरवलं किंवा चोरीला गेलं असेल तर ते लवकरात लवकर ब्लॉक करणं आवश्यक (How to block debit Card) असतं. काही वेळा तर कार्ड तुमच्याकडे असतानाही कार्डशिवाय ट्रान्झॅक्शन (Fraud Transaction) होतात, अशा परिस्थितीतसुद्धा कार्ड ताबडतोब ब्लॉक (Debit Card Block) केलं पाहिजे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं (SBI) आपल्या ट्विटर हँडलवर आपल्या 44 कोटी ग्राहकांसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कार्ड ब्लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया (Debit Card Block Process) टप्प्याटप्प्यानं सांगण्यात आली आहे. एकूण चार ऑप्शन्सचा वापर करून एसबीआय डेबिट कार्ड ब्लॉक करता येतं. आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया... 1. टोल फ्री क्रमांकावर कॉल करा तुमचं एसबीआय डेबिट कार्ड ब्लॉक करण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे टोल फ्री क्रमांकावरून मदत घेणं. तुम्ही एसबीआयच्या 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 या टोल फ्री क्रमांकावर (SBI Toll Free Number) कॉल करू शकता. टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर बँक एक्झिक्युटिव्ह तुम्हाला काही काही सूचना देतील. त्या फॉलो करून तुम्ही तुमचं कार्ड ब्लॉक करू शकता. हे वाचा-Gold Price: सोने - चांदी दर वधारला,तपासा आजचा मुंबई-पुण्यातील 22 कॅरेटचा लेटेस्ट 2. नेट बँकिंगची घ्या मदत - आपलं युजरनेम आणि पासवर्डवापरून www.onlinesbi.com या वेबसाईटवर लॉग इन करा. - ‘ई सर्व्हिसेस’ (E Services) टॅबवर गेल्यानंतर‘एटीएम कार्ड सर्व्हिसेस’ या ऑप्शनमधील ‘ब्‍लॉक एटीएम कार्ड’ हा सब-ऑप्शन सिलेक्ट करा. - त्यानंतर हरवलेल्या किंवा चोरी गेलेल्या डेबिट कार्डसोबत लिकं असलेलं अकाउंट सिलेक्ट करा. - त्याठिकाणी सर्व अॅक्टिव्ह आणि ब्‍लॉक केलेले कार्ड दिसतील. तुम्हाला कार्डचे पहले चार आणि शेवटचे चार डिजिट दिसतील. - ब्‍लॉक करावयाचं कार्ड आणि ब्‍लॉक करण्याचं कारण सिलेक्‍ट करा. ड्रॉपडाउन मेनूचा (Dropdown Menu) वापर करून कारण सिलेक्‍ट करता येऊ शकतं. त्यानंतर ‘सबमिट’ऑप्शनवर क्लिक करा. - तुम्ही भरलेल्या डिटेल्‍स व्हेरिफाय आणि कम्फर्म करा. कारण, कार्ड ब्‍लॉक झाल्यानंतर इंटरनेट फॅसिलिटी वापरून ते अनब्‍लॉक करता येत नाही. - ऑथेंटिकेशन पद्धत सिलेक्ट करा. हा एसएमएसद्वारे ओटीपी किंवा प्रोफाइल पासवर्ड असू शकतो. - गरजेच्या बॉक्‍समध्ये ओटीपी किंवा प्रोफाइल पासवर्ड टाईप करा. त्यानंतर पुन्हा - ‘कन्‍फर्म’ ऑप्शनवर क्लिक करा. - कार्ड ब्लॉक झाल्यानंतर तुम्हाला तिकीट नंबरसह एक मेसेज मिळेल. फ्युचर रेफरन्ससाठी तो जपून ठेवा. हे वाचा-महिन्याला 300 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवू शकता 10लाखांचा मोठा फंड,पाहा डिटेल्स 3. SMS पाठवून कार्ड करा ब्लॉक तुम्ही एसएमएस (SMS) पाठवूनसुद्धा तुमचं एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता. तुमचं ATM कार्ड ब्लॉक करण्यासाठी, तुम्हाला 567676 वर BLOCK XXXX असा मेसेज पाठवावा लागेल. येथे XXXX डेबिट कार्ड क्रमांकाचे शेवटचे चार अंक द्यावे लागतील. या ऑप्शनचा वापर करण्यासाठी बँकेत रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल क्रमांकावरूनच (Registered Mobile Number) एसएमएस पाठवावा लागेल. बँकेला तुमचा एसएमएस मिळाल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन एसएमएस पाठवला जाईल. या एसएमएस अलर्टमध्ये तिकीट क्रमांक, ब्लॉक करण्याची तारीख आणि वेळ दिलेली असेल. 4. बँकेच्या शाखेमध्ये जा तुम्ही तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये (Branch) जाऊनसुद्धा कार्ड ब्लॉक करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला बँक अधिकाऱ्यांना विनंती करावी लागेल. वरील चार पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमचं एसबीआय डेबिट कार्ड ब्लॉक करू शकता आणि खात्यातून होणारे गैरव्यवहार टाळू शकता.
First published:

Tags: SBI, Sbi account, Sbi alert, Sbi ATM

पुढील बातम्या