जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price: सोने - चांदी दर वधारला, तपासा आजचा मुंबई-पुण्यातील 22 कॅरेटचा लेटेस्ट रेट

Gold Price: सोने - चांदी दर वधारला, तपासा आजचा मुंबई-पुण्यातील 22 कॅरेटचा लेटेस्ट रेट

Gold Price: सोने - चांदी दर वधारला, तपासा आजचा मुंबई-पुण्यातील 22 कॅरेटचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: देशात 24 कॅरेट सोन्याचा दर आज 19 फेब्रुवारी रोजी 50 हजारांवर पोहोचला आहे. आजही सोने-चांदी दरात वाढ झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : देशात 24 कॅरेट सोन्याचा दर आज 19 फेब्रुवारी रोजी 50 हजारांवर पोहोचला आहे. आजही सोने-चांदी दरात वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर तसंच मेकिंग चार्जेस यासह विविध कारणांमुळे सोन्याच्या किमतीत दररोज चढ-उतार होत असतात. फर्स्ट पोस्टनुसार, कालच्या किमतीपेक्षा आज सोने दरात 540 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा दरही वधारला आहे. चांदीचा एक किलोचा भाव 64000 रुपये आहे. आज दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. Goodreturns नुसार, आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर (24 Carat Gold Price in Maharashtra) -

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई50190 रुपये50510 रुपये
पुणे50250 रुपये50400 रुपये
नाशिक50250 रुपये50400 रुपये
नागपूर50190 रुपये50510 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat Gold Price in Maharashtra) -

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई46000 रुपये46200 रुपये
पुणे46150 रुपये46200 रुपये
नाशिक46150 रुपये46200 रुपये
नागपूर46000 रुपये46200 रुपये

चांदीचा दर (Silver Price in Maharashtra) -

शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
मुंबई64000 रुपये63800 रुपये
पुणे64000 रुपये63800 रुपये
नाशिक64000 रुपये63800 रुपये
नागपूर64000 रुपये63800 रुपये

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

हे वाचा -  सोन्याला पुन्हा झळाळी; एक वर्षानंतर दर पुन्हा 50 हजार पार, महाग होण्यामागे आहेत ही दोन मोठी कारणं

कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात