Home /News /money /

महिन्याला 300 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवू शकता 10 लाखांचा मोठा फंड, कसा? पाहा डिटेल्स

महिन्याला 300 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवू शकता 10 लाखांचा मोठा फंड, कसा? पाहा डिटेल्स

जर तुम्ही रोज 10 रुपये सेव्ह करत असाल, तर महिन्याचे 300 रुपये होतात. हे पैसे सेव्ह करण्यासाठी तुम्ही सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी (SIP) मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडाल, तर पुढील 30 वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतचा फंड जमा करू शकता.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : स्मार्ट मनी मेकिंगअंतर्गत एक व्यक्ती 10 रुपयांच्या गुंतवणुकीवर 10 लाख रुपयांपर्यंतच्या फंडपर्यंत पोहोचू शकतो. जर तुम्ही रोज 10 रुपये सेव्ह करत असाल, तर महिन्याचे 300 रुपये होतात. हे पैसे सेव्ह करण्यासाठी तुम्ही सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी (SIP) मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडाल, तर पुढील 30 वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतचा फंड जमा करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे गुंतवणुकदारांना यात कंपाउंडिंगचा (Compounding) फायदा मिळतो आणि अधिक कालावधीसाठी अधिक रिटर्स मिळवता येतात. SIP - म्युचअल फंडमध्ये (Mutual fund) गुंतवणुकीचा सर्वात सोपा पर्याय SIP आहे. याद्वारे दर महिन्याला म्युचअल फंडमध्ये गुंतवणूक करता येते. SIP बँक RD प्रमाणे असते. पण इथे बँकेहून अधिक रिटर्न्स मिळतात. तुमच्या बँक खात्यातून दर महिन्याला ठरलेल्या वेळी ठरलेली रक्कम कट होऊन SIP मध्ये जाते. डेली एसआयपी (Daily SIP) - डेली बेसवर SIP अशा लोकांसाठी फायदेशीर ठरते जे व्यावसायिक आहेत किंवा अशा व्यवसायाशी संबंधित आहेत, जिथे दररोज इनकम असतं. दररोजच्या SIP मध्ये मिळणारे रिटर्न्स फंड मॅनेजमेंटवर निर्भर असतात. तुम्ही कोणत्या फंडात गुंतवणूक करतात यावर रिटर्न्स अवलंबून असतात. लार्ज कॅप (Large Cap Fund) फंडमध्ये रिटर्न्स एकसारखे असतात, त्यामुळे या फंडमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित ठरतं.

  हे वाचा - नवीन घर खरेदी करणं महागलं, तुमच्या शहरात किती टक्के जास्त भरावे लागणार?

  वीकली एसआयपी (Weekly SIP) - डेली SIP च्या तुलनेत वीकली SIP मध्ये महिन्यातून चार वेळा एक रक्कम तुमच्या बँक अकाउंटमधून कट होते. यात तुम्ही लहान रक्कम गुंतवू शकता. यात मार्केट रिस्कही कमी होते. ज्यावेळी मार्केट डाउन असतं, त्यावेळी वीकली SIP मधून अधिक यूनिट येतात.

  हे वाचा - एक वर्षानंतर दर पुन्हा 50 हजार पार, महाग होण्यामागे आहेत ही दोन मोठी कारणं

  मंथली एसआयपी (Monthly SIP) - दर महिन्याची अर्थात Monthly SIP लहान गुंतवणुकदार आणि नोकरदार वर्गासाठी सर्वात चांगला ऑप्शन आहे. ही SIP मॅनेज करणंही सोपं जातं. या माध्यमातून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय चांगला ठरतो.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Money, Mutual Funds, Savings and investments

  पुढील बातम्या