जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Budget 2022 : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची चाल कशी असते? समजून घ्या आणि नियोजन करा

Budget 2022 : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची चाल कशी असते? समजून घ्या आणि नियोजन करा

Budget 2022 : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची चाल कशी असते? समजून घ्या आणि नियोजन करा

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स लिमिटेडच्या अहवालानुसार, 2010 पासून, निफ्टी 50 निर्देशांकात आठवड्यात आणि महिन्यात रॅलीआधी आणि बजेटच्या दिवशी घसरण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 जानेवारी : केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत सादर केला जाणार आहे. संसदीय अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाईल, याला अर्थसंकल्पीय अधिवेशन असेही म्हणतात. हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance minister Nirmala Sitaraman) सादर करणार आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाची घोषणा ही देशातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. देशाला कोणत्या मार्गाने आणि कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे हे या दिवशी स्पष्ट होते. बाजारही अर्थसंकल्पानंतर आपले भविष्य ठरवण्याचा प्रयत्न करतो. निफ्टी 50 ची चाल कशी असेल? अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर बाजारावर होतो. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स लिमिटेडच्या अहवालानुसार, 2010 पासून, निफ्टी 50 निर्देशांकात (Nifty 50 INDEX) आठवड्यात आणि महिन्यात रॅलीआधी आणि बजेटच्या दिवशी घसरण झाली आहे. अर्थसंकल्पाच्या दिवसांत बाजाराचा सर्वाधिक परतावा 4.7 टक्के आणि कमाल 2.5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. Omicron मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका! GDP ग्रोथमध्ये घट होण्याचा अंदाज अर्थसंकल्पाच्या दिवशी सरासरी परताव्यात 0.2 टक्क्यांची घसरण झाली आहे, अर्थसंकल्पाच्या दिवसाच्या आधीच्या महिन्यात 1.9 टक्के आणि बजेटच्या आधीच्या महिन्यात 0.7 टक्के घट झाली आहे. गेल्या महिन्यात, सर्वात मोठी घसरण 7.1 टक्के आहे आणि जास्तीतजास्त परतावा 5.6 टक्के आहे. अर्थसंकल्पावर मिड-कॅप्सची रिअॅक्सन लार्ज-कॅप्सपेक्षा अधिक अस्थिर आहे. अहवालात असे म्हटले आहे की निफ्टी 500 बजेटच्या आधी निफ्टी 50 च्या खाली जातो, परंतु नंतर त्याच्या पलीकडे जातो. दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाखांचा फंड, वाचा सविस्तर अर्थसंकल्पात काय होऊ शकते? विकासाला आधार देणे हा अर्थसंकल्पाचा मुख्य फोकस असेल, असेही अहवालात म्हटले आहे. आगामी अर्थसंकल्पातून अपेक्षित असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आश्वासक वित्तीय धोरणांद्वारे (Supportive fiscal policies) वाढ स्थिर ठेवण्यासाठी विशिष्ट उपाययोजना, आक्रमक MSP वाढीसह (aggressive MSP hikes) शेतीमालाच्या किमतीत सुधारणा आणि अन्न अनुदान यांचा समावेश आहे. तथापि, कोणतीही मोठी सुधारणा अपेक्षित नाही आणि मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि PLI योजना यासारख्या योजना सुरू राहतील अशी अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात