मुंबई, 8 जून : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रेपो दरात (Repo Rate) सलग दुसऱ्या महिन्यात वाढ करण्याची घोषणा करून एकप्रकारे धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.90 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरवाढीचा निर्णय घेतल्याचे आरबीआयने सांगितले आहे. RBI च्या या निर्णयामुळे सर्वच बँकाचे कर्जाचे व्याजदार पुन्हा वाढतील. त्यामुळे EMI चा अतिरिक्त बोजा सर्वसामान्यांवर पडणार आहे.
होम लोनवर किती पैसे ज्यादा जाणार?
जर एखाद्या व्यक्तीने 7.30 टक्के दराने 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे होम कर्ज (Home Loan) घेतले तर त्याला 23,802 रुपयांचा EMI भरावा लागेल. जर त्या व्यक्तीने 7.80 टक्के दराने 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले, तर त्याला 24,721 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशाप्रकारे तुमचा EMI दर महिन्याला 919 रुपयांनी वाढेल. अशाप्रकारे, एका वर्षात तुमच्या कर्जाची किंमत 11,028 रुपये अधिक असेल. तसेच 20 वर्षात तुमच्या कर्जाची किंमत 2,20,560 रुपयांनी वाढेल.
Canara Bank Interest Rates: कॅनरा बँक ग्राहकांचं घरखर्चाचं बजेट बिघडणार, बँकेकडून व्याजदरांत वाढ
गाडी खरेदीवर किती खर्च वाढणार?
जर एखाद्या व्यक्तीने 4,28,000 रुपयांची कार 7.7 टक्के दराने सात वर्षांसाठी कार लोन (Car Loan) घेतले, तर त्याचा EMI रुपये 6,607 असेल. त्याच वेळी, जर बँकांनी रेपो दरात वाढीचा संपूर्ण भार ग्राहकांवर टाकला आणि व्याज दर 8.2 टक्क्यांपर्यंत पोहोचला, तर त्याच रकमेच्या आणि कालावधीच्या कर्जासाठी EMI 6,714 रुपये होईल. अशा प्रकारे, तुम्हाला दरमहा 107 रुपये अधिक आणि वर्षभरात 1,284 रुपये अधिक द्यावे लागतील. तर सात वर्षांत तुम्हाला एकूण 8,988 रुपये अधिक भरावे लागतील.
ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी RBI चा नवीन नियम लवकरच लागू होणार; काय आहे नियम?
महागाईबाबत चिंता
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das ) यांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली आहे. RBI गव्हर्नर म्हणाले की, महागाई सातत्याने वाढत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) पुरवठा समस्यांमुळे महागाई वाढली आहे. कोविड महामारीनंतर आरबीआय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावले उचलत राहील. जगभरातील आर्थिक घडामोडींमध्ये मंदी आली असून त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात महागाईचा ताण वाढत आहे. शेतमाल बाजारातही घट झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.