जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Canara Bank Interest Rates: कॅनरा बँक ग्राहकांचं घरखर्चाचं बजेट बिघडणार, बँकेकडून व्याजदरांत वाढ

Canara Bank Interest Rates: कॅनरा बँक ग्राहकांचं घरखर्चाचं बजेट बिघडणार, बँकेकडून व्याजदरांत वाढ

Canara Bank Interest Rates: कॅनरा बँक ग्राहकांचं घरखर्चाचं बजेट बिघडणार, बँकेकडून व्याजदरांत वाढ

Canara Bank Interest Rates: महागाईमुळे त्रस्त असलेल्या लोकांना ईएमआयचेही जास्त पैसे भरावे लागणार आहेत. त्यात आज रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केल्याने येत्या काळात कॅनरा बँक आपले व्याजदर आणखी वाढून शकते.

    मुंबई, 8 जून : देशातील महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा भारही वाढला आहे. इंधन, ऊर्जा आणि दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या किमतींत सातत्याने वाढ सुरू आहे. इंधन (Fuel) आणि गॅस (Gas) दरवाढीसह खाद्यपदार्थांच्या किमतीतही सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. अशातच आता देशातल्या एका सरकारी बँकेने लोनवरील (Loan) व्याजाच्या दरात वाढ केली आहे. कॅनरा बँकेने कर्जावरील व्याजदर काल म्हणजेच 7 जून पासून वाढवला आहे, त्यामुळे आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या लोकांना ईएमआयचेही जास्त पैसे भरावे लागणार आहेत. त्यात आज रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केल्याने येत्या काळात कॅनरा बँक आपले व्याजदर आणखी वाढून शकते. कॅनरा बँकेने (Canara Bank) 6 महिने आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी असलेल्या MCLRमध्ये (Marginal cost-based lending rates) 5 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यानंतर ग्राहकांना दोन वेगवेगळ्या कालावधीसाठी 7.30 टक्क्यांऐवजी 7.35 टक्के आणि 7.35 ऐवजी 7.40 टक्के व्याज भरावं लागेल. या दोन कालावधीतील MCLR वगळता, उर्वरित कालावधीसाठी MCLR च्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. RBI Hike Repo Rate: RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ, EMI चा बोजा वाढणार RLLR च्या रिटेल लेंडिंग स्कीमच्या व्याजदरात बदल कॅनरा बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, वाढीव व्याज दर 7 जून किंवा त्यानंतर जारी केल्या जाणाऱ्या कर्ज आणि अॅडव्हान्ससाठी लागू होतील. तसंच कॅनरा बँकेने 7 जून, 2022 पासून RLLR शी (Repo Linked Lending Rate) संबंधित सर्व रिटेल लेंडिंग स्कीमच्या व्याजदरात बदल करून ते 7.30 टक्के केले आहेत. कर्जावर व्याज जास्त, तर ठेवीवर कमी बँका कर्जाचे व्याजदर वाढवत असून, एफडी (FD) आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करत आहेत. परिणामी, एकीकडे लोकांना कर्जासाठी जास्त ईएमआय द्यावा लागतोय, तर दुसरीकडे बँकांमधील एफडी आणि इतर ठेवींवर कमी नफा मिळतोय, त्यामुळे दोन्ही बाजूंनी सर्वसामान्यांवर व्याजाचा बोजा वाढत आहे. महागडं कर्ज आणि FD वर कमी नफा यामुळे लोकांच्या बचतीवर थेट परिणाम होतोय. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी RBI चा नवीन नियम लवकरच लागू होणार; काय आहे नियम? याआधी चार बँकांनी वाढवले व्याजदर कॅनरा बँकेच्या आधी देशातील चार प्रमुख बँकांनी होम लोनवरील व्याजदर वाढवला आहे. पीएनबीच्या व्याज दरात 0.15%, HDFC च्या व्याजदरात 0.05%, बँक ऑफ इंडिया आणि ICICI बँकेने होमलोनच्या व्याजदरात वाढ केली होती. रेपो रेट पुन्हा वाढला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das, Governor, Reserve Bank of India) यांनी आज रेपो दरात वाढीची घोषणा केली. रेपो रेट (Repo Rate) 0.50  टक्क्यांनी वाढवण्यता आल्याने तो आता 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे लोन (Loan) आणखी महाग होतील आणि सर्वसामान्यांवर ईएमआयचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात