Home /News /money /

खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल; मात्र सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता

खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल; मात्र सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता

गेल्या आठवड्यातही सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याची मोठी घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने वार्षिक 20 लाख टन सोया तेलाच्या आयातीवरील शुल्क रद्द केले.

    मुंबई, 1 जून : खाद्यतेलाच्या (Edible Oil) किमती कमी करण्यासाठी सरकारने (Central Government) पुन्हा एकदा मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाम तेलाच्या आधारभूत आयात किमतीत कपात करण्यात आली आहे, तर सोयाबीन तेल आणि सोने आणि चांदीच्या आधारभूत आयात किंमतीत (Import Price) वाढ करण्यात आली आहे. सरकारने मंगळवारी उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, क्रूड आणि रिफाइंड पाम तेलाची (Refined Palm Oil) मूळ आयात किंमत कमी करण्यात आली आहे, तर क्रूड सोया तेलाची आयात किंमत वाढवण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात सोयाबीन तेल महाग होऊ शकते, तर पामतेलाच्या किरकोळ दरात घसरण होण्याची शक्यता आहे. सरकार दर पंधरा दिवसांनी खाद्यतेल आणि सोने-चांदीच्या आधारभूत आयात किंमतीत बदल करते. या किमतीच्या आधारे सरकार करही ठरवते. उत्पादनाची मूळ आयात किंमत त्यावर किती कर आकारायचा हे ठरवते. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ फक्त मूळ किमतीवर व्यावसायिकांसाठी कर दायित्व ठरवते. New Rule: आजपासून बदलणारे 'हे' 10 नियम तपासा, थेट तुमच्या खर्चावर होणार परिणाम गेल्या आठवड्यातही सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याची मोठी घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने वार्षिक 20 लाख टन सोया तेलाच्या आयातीवरील शुल्क रद्द केले. भारत दरवर्षी सुमारे 60 टक्के खाद्यतेल आयात करतो, जे जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तेल किती स्वस्त? कच्चे पाम तेल, जे आधी 1,703 डॉलर प्रति टन आयात केले जात होते, ते आता 1,625 डॉलर प्रति टन दराने उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, RBD पाम तेलाची मूळ आयात किंमत देखील 1,765 डॉलर प्रति टन वरून 1,733 डॉलरपर्यंत कमी करण्यात आली आहे. RBD पामोलिनची मूळ आयात किंमत देखील 1,744 डॉलरपर्यंत कमी करण्यात आली आहे, जी पूर्वी 1,771 डॉलर प्रति टन आयात केली जात होती. रेल्वेने प्रवास करताना जास्तीचं सामान घेण्याआधी नियम समजून घ्या; अन्यथा दंड भरावा लागेल सरकारने पामतेलाच्या आयात दरात कपात केली असताना, कच्च्या सोया तेलाची आयात महाग झाली आहे. आता व्यापार्‍यांना पूर्वी 1,827 डॉलरवरून आयात केलेल्या कच्च्या सोया तेलासाठी प्रति टन 1,866 डॉलक द्यावे लागतील. याशिवाय सोने-चांदीच्या मूळ आयात किंमतीतही वाढ झाली आहे. सोन्याची मूळ आयात किंमत आता प्रति 10 ग्रॅम 597 डॉलर असेल, जी पूर्वी 592 डॉलर होती. त्याचप्रमाणे, चांदीची मूळ आयात किंमत आता प्रति किलो 721 डॉलर आहे, जी पूर्वी 687 डॉलर प्रति किलो होती.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Gold and silver prices today, Money

    पुढील बातम्या