जाहिरात
मराठी बातम्या / मनी / HDFC चे 100 खातेधारक काही सेकंदात बनले 130 कोटींची मालक; अन्...

HDFC चे 100 खातेधारक काही सेकंदात बनले 130 कोटींची मालक; अन्...

HDFC चे 100 खातेधारक काही सेकंदात बनले 130 कोटींची मालक; अन्...

तामिळनाडूतील टी. नगर येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतील हा प्रकार आहे. रविवारी याच शाखेतील 100 ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस आला होता. यामध्ये त्यांच्या खात्यात 13 कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जून : एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) असा प्रकार घडला आहे, जो कुणी ऐकला त्याला धक्काच बसला. गेल्या रविवारी बँकेतून 100 ग्राहकांच्या (HDFC Customers) खात्यात 1300 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. एवढी मोठी रक्कम खात्यात आल्याचा SMS ग्राहकांना येताच लोकांच्या आनंद गगनात मावत नव्हता. पण, त्यांचा हा आनंद काही वेळेसाठी होता. म्हणजे नेमकं काय घडलं पाहुया. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, तामिळनाडूमधील HDFC बँकेने रविवारी एका दिवसासाठी 100 हून अधिक ग्राहकांना करोडपती केले. प्रत्येक ग्राहकाच्या खात्यात 13-13 कोटी रुपये ट्रान्सफर (Fund Transfer) करण्यात आले. ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर पैसे टाकण्याचा मेसेज येताच त्यांना लॉटरी जिंकल्यासारखे वाटले. पण, जेव्हा त्यांनी खाते तपासले तेव्हा त्याच्या आनंदावर विरजण पडले. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या बँकेचा हा पराक्रम पाहता पाहता व्हायरल झाला आणि एकच चर्चा रंगू लागली. LPG Price: महागाईत दिलासा, LPG सिलेंडर झाला स्वस्त; आता काय आहे नवीन किंमत? तामिळनाडूतील टी. नगर येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतील हा प्रकार आहे. रविवारी याच शाखेतील 100 ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस आला होता. यामध्ये त्यांच्या खात्यात 13 कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले. असे मेसेज सर्व 100 ग्राहकांना आले होते, म्हणजेच खात्यात 1300 कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याची चर्चा होती. यातील एका ग्राहकाने हा मेसेज पाहिल्यावर घाबरून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांच्या तपासात तांत्रिक बिघाडामुळे खातेदारांच्या मोबाईल क्रमांकावर चुकून असा एसएमएस आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. एचडीएफसीच्या या शाखेत सॉफ्टवेअर पॅचची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे ही चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. एक रुपयांचं ‘हे’ नाणं तुम्हाला करोडपती बनवू शकतं; काय करावं लागेल? अहवालात एचडीएफसीच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देऊन पुष्टी केली की हे सर्व बँकेच्या सिस्टमधील तांत्रिक समस्येमुळे घडले आहे. या ग्राहकांच्या खात्यात ना बँकेची यंत्रणा हॅक झाली आहे ना 13-13 कोटी रुपये जमा झाले आहेत. या प्रकरणाशी संबंधित फक्त मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात