जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Aadhar Card: आधारकार्डचे विविध प्रकार आहेत उपलब्ध, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि फायदे

Aadhar Card: आधारकार्डचे विविध प्रकार आहेत उपलब्ध, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि फायदे

Aadhar Card: आधारकार्डचे विविध प्रकार आहेत उपलब्ध, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि फायदे

आधार कार्ड UIDAI द्वारे जारी केले जाते. या दस्तऐवजाचे महत्त्व लक्षात घेऊन UIDAI ने आधारचे अनेक प्रकार जारी केले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 सप्टेंबर : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा पुरावा आहे. सरकारी असो वा खाजगी सर्व कामात हा दस्तऐवज आवश्यक आहे. आधार कार्डवर कार्डधारकाची सर्व आवश्यक माहिती जसे की नाव, फोटो, जन्मतारीख, पत्ता आदींची नोंद केली जाते. आधार कार्ड UIDAI द्वारे जारी केले जाते. या दस्तऐवजाचे महत्त्व लक्षात घेऊन UIDAI ने आधारचे अनेक प्रकार जारी केले आहेत. हे सर्व फॉरमॅटमध्ये तितकेच वैध आहे. ई-आधार ई आधार इलेक्ट्रॉनिक व्हर्जन आहे, ज्याला पासवर्ड सिक्युरिटी आहे. यात ऑफलाइन पडताळणीसाठी सुरक्षित QR कोड देखील आहे. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाद्वारे UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते ई-आधार तयार केले जाऊ शकते. डाउनलोड करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. टायपिंग मिस्टेक समोर येताच या शेयरमध्ये उसळी; एका दिवसात 20 टक्क्यांची तेजी आधार लेटर हे पेपर बेस्ड लॅमिनेटेड लेटर आहे. पत्रामध्ये कार्ड जारी करण्याची तारीख आणि प्रिंट तारखेसह सुरक्षित QR कोड आहे. जर तुम्हाला नवीन आधार बनवायचा असेल किंवा त्यात बायोमेट्रिक अपडेट करायचे असेल तर हे आधार लेटर मोफत आहे. ओरिजनल कॉपी हरवल्यास किंवा खराब झाल्यास, आधार पत्र UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन बदलता येईल. यासाठी 50 रुपये आकारले जातात. एम आधार UIDAI ने विकसित केलेले अधिकृत मोबाईल अॅप्लिकेशन (mAadhaar Mobile App) आहे. हे आधार धारकांना CIDR कडे नोंदणीकृत त्यांचे आधार रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक इंटरफेस प्रदान करते. mAadhaar प्रोफाइलला विमानतळ आणि रेल्वेने वैध आयडी पुरावा म्हणून मान्यता दिली आहे.

पर्सनल लोनचे तोटे समजून घ्या; विचारपूर्वक लोन घ्या अन्यथा पश्चाताप करावा लागू शकतो

आधार पीव्हीसी कार्ड UIDAI द्वारे जारी केलेल्या आधार PVC कार्डची ही नवीनतम आवृत्ती आहे. हलके आणि टिकाऊ असण्याव्यतिरिक्त, PVC बेस्ड आधार कार्डमध्ये डिजिटल QR कोड माहितीसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही आधार क्रमांक, व्हर्च्युअल आयडी किंवा नावनोंदणी आयडीद्वारे uidai.gov.in किंवा Resident.uidai.gov.in वर भेट देऊन डाउनलोड करू शकता, ज्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात