मुंबई, 6 सप्टेंबर : अचानक पैशांची गरज लागते तेव्हा अनेकजण वैयक्तिक कर्जाद्वारे आपली ती गरज पूर्ण करतात. सर्व बँकांमध्ये वैयक्तिक कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. हे सहज मिळू शकते कारण कार कर्ज आणि गृह कर्जाप्रमाणे वैयक्तिक कर्जासाठी कोणतीही हमी आवश्यक नसते. त्यामुळे ते असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवले जाते.
मात्र जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर त्याचे तोटेही जाणून घ्या. जेणेकरून तुम्ही कर्ज घेण्याचा निर्णय काळजीपूर्वक घ्याल आणि तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागणार नाही.
वैयक्तिक कर्जाचा व्याजदर जास्त
कार लोन, होम लोन इत्यादींच्या तुलनेत वैयक्तिक कर्जाचा व्याजदर खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, कर्जाची परतफेड करताना तुम्हाला मोठा ईएमआय द्यावा लागतो, ज्याचा परिणाम तुमच्या मासिक खर्चावर होतो. अनेक वेळा लोक कर्ज घेतात, पण नंतर ते फेडण्यात अडचणी येतात. त्यामुळे जितके कर्ज तुम्ही सहज फेडू शकता तितकेच घ्या. कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या EMI बद्दल जाणून घ्या. तुम्ही वैयक्तिक कर्ज EMI लोन कॅल्क्युलेटरद्वारे तुमचा EMI ऑनलाइन देखील मोजू शकता.
टायपिंग मिस्टेक समोर येताच या शेयरमध्ये उसळी; एका दिवसात 20 टक्क्यांची तेजी
पुराव्याशिवाय लोन मिळत नाही
वैयक्तिक कर्ज घेताना उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. उत्पन्नाच्या दाखल्याशिवाय ते मिळत नाही. बहुतेक बँकांमध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, पगारदार लोकांचा पगार दरमहा किमान 15000 असावा अशी अट आहे. या व्यतिरिक्त, वैयक्तिक कर्जामध्ये चांगला CIBIL स्कोअर असणे खूप महत्वाचे आहे. तुमचा CIBIL स्कोर खराब असल्यास, तुम्हाला कर्ज मंजूरीमध्ये खूप समस्या येऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक कर्जासाठी तुम्हाला नोकरीच्या डिटेल्स, अॅड्रेस प्रुफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असेल. ते सबमिट केल्यानंतर किंवा ऑनलाइन अपलोड केल्यानंतर, कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पडताळणीनंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instant loans, Loan, Money