मुंबई, 6 सप्टेंबर : भारतीय शेअर बाजारात सुझलॉन एनर्जी शेअरच्या किमतीत मोठी काल पाहायला मिळाली. सोमवारच्या सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा शेअर बीएसईवर 20% अपर सर्किटसह 10.57 रुपयांवर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून या स्टॉकमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये, या शेअरने 26% पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. गेल्या एका महिन्यात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये सुमारे 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. BSE वर, हा एनर्जी स्टॉक सोमवारी 19.98 टक्क्यांनी अप्परच्या सर्किटवर होता. गेल्या आठवडाभरात त्यात सुमारे 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात तो पेनी स्टॉक म्हणून गणला जातो.
शेअरमध्ये अचानक तेजीचं कारण? SBI कॅपिटल मार्केट्स ट्रस्टीचे स्पष्टीकरण हे सुझलॉनच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे. त्यांच्याकडे असलेले अतिरिक्त शेअर्स अदानी ग्रीन एनर्जीचे नसून सुझलॉन एनर्जीचे असल्याचे ट्रस्टीने स्पष्ट केले आहे. यापूर्वी, एसबीआय ट्रस्टीने सांगितले होते की त्यांच्याकडे असलेले अतिरिक्त शेअर्स अदानी ग्रीन एनर्जीचे आहेत. आता ट्रस्टीने ही टायपिंग मिस्टेक असल्याचे म्हटले आहे. या स्पष्टीकरणाचे वृत्त समोर आल्यानंतर सुझलॉनच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली आणि शेअरमध्ये अप्पर सर्किट झाले. केंद्र सरकारच्या ‘ही’ योजना पुढील महिन्यापासून बंद होणार; योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल? सुझलॉन एनर्जीने आज 5 सप्टेंबर रोजी एक्सचेंजला माहिती दिली की SBI ट्रस्टीने प्रमोटर्सच्या शेअर्सबाबत घोषणा केली होती ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता यात स्पष्टता आली आहे. कंपनीने म्हटले आहे की एसबीआय ट्रस्टीने घोषित केले होते की सेबीच्या नियमांनुसार त्यांनी अदानी ग्रीनचे शेअर्स ठेवले आहेत. खरे तर टार्गेट कंपनीचा उल्लेख चुकीचा होता, ती कंपनी सुझलॉन होती.