मुंबई, 20 जानेवारी: आजच्या काळात प्रत्येकाकडे कोणते ना कोणते वाहन आहे. लोक त्यांच्या गरजेनुसार कार किंवा बाईक सोबत ठेवतात. रस्त्यावरून ये-जा करताना वाहनांचा केव्हाही अपघात होणे नित्याचे झाले आहे. अशा परिस्थितीत वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी विमा काढणे आवश्यक आहे. हे केवळ अपघातामुळेच नाही तर वाहन चोरीमुळे तुमच्या वाहनाचे झालेले नुकसान भरून काढण्यासही मदत करते. सध्याच्या काळात वाहन विमा गरजेचा असतो. अनेक कंपन्यांकडून या विम्यासाठी विविध योजना ऑफर केल्या जातात. ज्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीत तुमच्या वाहनाला होणारे नुकसान कमी केले जाते. कोणत्याही वाहनाचा विमा हप्ता योजनेनुसार ठरवण्यात येतो. अशा परिस्थितीत विमा योजनेचा हप्ता कोणत्या आधारावर ठरवला जातो. याविषयी तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक आहे. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. रेल्वेने नियमित प्रवास करता तर ‘ही’ माहिती असायलाच हवी…
विमा उतरवलेले घोषित मूल्य
कोणत्याही वाहनाचे विमा उतरवलेले घोषित मूल्य (IDV) हे त्याच्या बाजार मूल्याच्या बरोबरीचे असते. त्याचे मूल्य जितके जास्त असेल, तितके अधिक तुम्ही विमा कंपनीकडून क्लेमच्या वेळी दावा करू शकता. मात्र, डेप्रिसिएशन मुळे IDV दरवर्षी कमी होत राहते. Tata ची ग्राहकांना भेट! ‘या’ कारच्या किंमती केल्या कमी
वाहनाचे वय
विमा प्रीमियमचे कॅलक्युलेशन करताना तुमच्या वाहनाचे वय हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यामुळे कोणत्याही अपघाताच्या वेळी जुन्या वाहनामध्ये जास्त खर्च लागतो. विमा काढताना तुमचे वाहन किती जुने आहे? या विषयावर विशेष लक्ष दिले पाहिजे.
वाहन नोंदणी
विम्याचा हप्ता ठरवण्यासाठी वाहन नोंदणी ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्या वाहनाचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शहरात विम्याचा हप्ताही जास्त असतो.
डिडक्टिबल (Deductibles)
डिडक्टिबल म्हणजे, जे पैसे तुम्हाला क्लेमच्या वेळी खिशातून भरावे लागतात. तुम्ही विमा कंपन्यांकडून जास्त डिडक्टिबलसाठी विनंती करू शकता. जास्त डिडक्टिबलमुळे तुमचा प्रीमियम देखील कमी होऊ शकतो.