मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एजंट काही सेकंदात ट्रेनचं तिकीट बुक करतात, मग सर्वसामन्यांना का नाही जमत? काय आहे सगळा प्रकार?

एजंट काही सेकंदात ट्रेनचं तिकीट बुक करतात, मग सर्वसामन्यांना का नाही जमत? काय आहे सगळा प्रकार?

एजंट एक सॉफ्टवेअर वापरतात. या सॉफ्टवेअरच्या मदतीने, दोन्ही कॅप्चा भरण्याची गरज नाही, सॉफ्टवेअर त्यास बायपास करते.

एजंट एक सॉफ्टवेअर वापरतात. या सॉफ्टवेअरच्या मदतीने, दोन्ही कॅप्चा भरण्याची गरज नाही, सॉफ्टवेअर त्यास बायपास करते.

एजंट एक सॉफ्टवेअर वापरतात. या सॉफ्टवेअरच्या मदतीने, दोन्ही कॅप्चा भरण्याची गरज नाही, सॉफ्टवेअर त्यास बायपास करते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 31 ऑगस्ट : भारतीय रेल्वेसाठी रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी सामान्य माणसाला सरासरी दोन मिनिटे लागतात. कधी-कधी यापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र अनेकदा ट्रेनची सर्व कन्फर्म तिकिटे बुक असल्याने वेटिंग तिकीट मिळते. पण दुसरीकडे एजंट काही सेकंदात सर्व कन्फर्म तिकिटे गायब करतात. अलीकडेच, आरपीएफने पकडलेले एजंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्सने याचा खुलासा केला आहे. नक्की एजंट हे काम कसं करतात यावर एक नजर टाकूया.

जेव्हा एखाद्या सामान्य व्यक्तीला निर्धारित वेळेत IRCTC वेबसाइटला भेट देऊन तिकीट बुक करायचे असेल, तेव्हा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉगिन कॅप्चा टाकावा लागतो. त्यानंतर प्रवाशांचे तपशील भरले जातात. एका यूजर आयडीवरून एक ते सहा प्रवाशांसाठी तिकीट बुक करता येतात. ते सबमिट करण्यासाठी कॅप्चा देखील भरावा लागेल. पेमेंट करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये ओटीपी येतो, तो एंटर केल्यानंतर पेमेंट होते आणि त्यानंतर तिकीट उपलब्ध होते. यात सरासरी 2 मिनिटे जातात.

National Pension System: तिशी गाठली तरी रुपयाचीही बचत नाही? 'या' सरकारी योजनेत करा गुंतवणूक मिळेल दीड लाख रुपये पेन्शन

मात्र यासाठी एजंट एक सॉफ्टवेअर वापरतात. या सॉफ्टवेअरच्या मदतीने, दोन्ही कॅप्चा भरण्याची गरज नाही, सॉफ्टवेअर त्यास बायपास करते. त्याच वेळी, पेमेंटसाठी देखील OTP आवश्यक नाही, थेट पेमेंट केले जाते. अशा प्रकारे दलाल काही सेकंदात कन्फर्म तिकीट बुक करतात.

दलाल एका आयडीने 144 प्रवाशांची तिकिटे काढत होते

एका आयडीने सहा प्रवाशांसाठी तिकीट बुक करता येते. म्हणजेच, व्हर्च्युअल सहा लोकांना बुकिंग रांगेत उभे केले जाऊ शकते, तर ब्रोकर एका आयडीसह 144 लोकांसाठी तिकीट बुक करू शकतो. यामुळे सर्वसामान्यांना तिकिटे मिळत नाहीत. पहिली तिकिटे काही सेकंदात बुक होतात आणि दुसरे एकाचवेळी 144 लोकांची तिकिटे बुक होतात. इतकेच नाही तर सॉफ्टवेअरच्या मदतीने 144 प्रवाशांचे तपशील अगोदरच तयार होते, जे वेळेवर जोडले जातात. अशा प्रकारे तपशील भरण्यासाठी लागणारा वेळही वाचतो.

PM Kisan Yojna: 'या' शेतकऱ्यांना 12वा हप्ता 2000 नाही 4000 रुपयांचा येईल, काय आहे कारण?

सॉफ्टवेअर रशियाकडून विकसित केले

आरपीएफच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्या एजंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपरने असे सॉफ्टवेअर रशियामध्ये विकसित केल्याचे सांगितले. या सॉफ्टवेअरचे भाडे देखील वेगळे आहे. उदाहरणार्थ, एका आयडीमध्ये दोन व्हर्च्युअल प्रवासी असलेल्या सॉफ्टवेअरचे भाडे 600 रुपये प्रति महिना आणि 24 व्हर्च्युअल प्रवासी असलेल्या सॉफ्टवेअरचे भाडे 10000 रुपये आहे. व्हर्च्युअल प्रवाशांची संख्या सहा पटीने वाढवता येऊ शकते, कारण एका आयडीमध्ये सहा लोकांसाठी तिकिटे बुक करता येतात. आरपीएफने सांगितले की, एजंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या विरोधात मोहीम सातत्याने चालवली जात आहे.

First published:

Tags: Indian railway, IRCTC, Railway