मुंबई, 31 ऑगस्ट: अलीकडच्या काळात ज्या प्रकारे महागाई वाढत आहे, त्यानुसार आजपासून 20 ते 30 वर्षांनंतर आपल्या गरजांवर होणारा खर्च दुप्पट किंवा त्याहूनही अधिक असू शकतो. त्यामुळे पगारदारांनी निवृत्ती किंवा भविष्यासाठी आर्थिक नियोजन वेळेत करणं महत्त्वाचं आहे. परंतु असे अनेक लोक आहेत जे नोकरीच्या सुरुवातीच्या वर्षांत सेवानिवृत्ती पाहता पेन्शन नियोजन करू शकत नाहीत. जेव्हा हे लक्षात येतं तोपर्यंत बरीच वर्ष निघून गेलेली असतात. अशा स्थितीत वयाच्या 35 किंवा त्याहून अधिक वयापर्यंत त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटू लागते. जर तुम्ही देखील त्यांच्यापैकीच एक असाल आणि वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत असं कोणतंही नियोजन केलेलं नसेल, तर टेन्शन घेऊ नका. कारण तुम्ही सरकारच्या स्कीम नॅशनल पेन्शन सिस्टमचा (National Pension System Calculation) लाभ घेऊ शकता. 1.50 लाख पेन्शन कशी मिळवायची?- जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत म्हणजेच पुढील 30 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा 10,000 रुपये गुंतवावे लागतील. तोपर्यंत तुम्ही केलेली एकूण गुंतवणूक 36 लाख रुपये असेल. एकूण गुंतवणुकीवरील अंदाजे परतावा 10 टक्के गृहीत धरला तर एकूण निधी 2.28 कोटी रुपये होईल. यापैकी तुम्ही 40 टक्के रक्कम असलेली अॅन्युइटी खरेदी केली आणि वार्षिक 8 टक्के अॅन्युइटी रेट असेल, तर वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 60 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. तर एकरकमी मूल्य 1.37 कोटी असेल. SWP मध्ये एकरकमी रक्कम गुंतवू शकता- आता येथे तुम्ही म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP) मध्ये वरील रक्कम गुंतवू शकता. SWP मध्ये अपेक्षित परतावा 8 टक्के प्रतिवर्ष असू शकतो. या अर्थाने एका वर्षावरील व्याज 10.96 लाख असेल. वर्षाच्या 12 महिन्यांत विभागले तर मासिक उत्पन्न 91333 रुपये होईल. एकूण मासिक उत्पन्न: एन्यूटीतून 60 हजार रुपये प्रति महिना आणि SWP मधून.91 हजार रुपये प्रति महिना. हे दरमहा सुमारे 1.50 लाख रुपये असेल. (टीप: एनपीएस प्लॅनमध्ये किमान 40 टक्के रकमेची अॅन्युइटी खरेदी करणं आवश्यक आहे. जास्त पेन्शनसाठी, अॅन्युइटीची रक्कम वाढवली जाऊ शकते.) हेही वाचा- Investment Tips: जमिनीत गुंतवणूक करण्यापूर्वी घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, नाहीतर याल अडचणीत कुठे गुंतवली जाते तुमची रक्कम- 18 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक काही आवश्यक प्रक्रियांचं पालन केल्यानंतर या योजनेत भाग घेऊ शकतो. NPS मध्ये जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी PFRDA द्वारे नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिली जाते. ते तुमची गुंतवणूक इक्विटी, सरकारी रोखे आणि गैर-सरकारी रोख्यांशिवाय फिक्स्ड इनकम इंस्ट्रूमेंटमध्ये गुंतवतात. नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये दोन प्रकारची खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. या टियर-1 मध्ये पेन्शन खाते असतं. त्याच वेळी, टियर-2 खातं हे ऐच्छिक बचत खातं असतं. टियर-1 खाते असलेले एनपीएस सदस्य टियर-2 खाते उघडू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.