जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PM Kisan Yojna: 'या' शेतकऱ्यांना 12वा हप्ता 2000 नाही 4000 रुपयांचा येईल, काय आहे कारण?

PM Kisan Yojna: 'या' शेतकऱ्यांना 12वा हप्ता 2000 नाही 4000 रुपयांचा येईल, काय आहे कारण?

PM Kisan Yojna: 'या' शेतकऱ्यांना 12वा हप्ता 2000 नाही 4000 रुपयांचा येईल, काय आहे कारण?

PM Kisan Yojna: 31 मे रोजी सरकारने 11 वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर केला होता. देशात असे बरेच शेतकरी देखील आहेत, ज्यांना 11 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 ऑगस्ट : देशातील 10 कोटीहून अधिक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी पंतप्रधान किसान योजनेचे 11 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत दरवर्षी सरकार शेतकर्‍यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत पुरवते. ही रक्कम शेतकर्‍याच्या बँक खात्यात 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्याच्या स्वरुपात ट्रान्सफर केली जाते. प्रधानमंत्री किसान योजनेचा 12 हप्ता लवकरच शेतकर्‍यांना मिळणार आहे. 31 मे रोजी सरकारने 11 वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर केला होता. देशात असे बरेच शेतकरी देखील आहेत, ज्यांना 11 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. ते पात्र होते आणि त्याचे नाव देखील लाभार्थ्यांच्या यादीमध्ये होते. तरीही 11 व्या हप्त्याचे पैसे खात्यात न येण्याची अनेक कारणे होती. ज्यांचे कागदपत्रे योग्य आहेत, त्या शेतकर्‍यांना आता 12 वा हप्ता तसेच 11 व्या हप्त्याचे पैसे मिळू शकतात. अशाप्रकारे, यावेळी सरकारकडून त्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांऐवजी 4 हजार रुपये येतील. 1 सप्टेंबरपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम, शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होणार परिणाम पैसे न मिळण्याचं कारण? पीएम किसन योजनेच्या लाभार्थी शेतकर्‍याचा हप्ता अनेक कारणांमुळे अडकला आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे शेतकऱ्याने दिलेल्या कागदपत्रांमध्ये अपुरी माहिती किंवा माहिती योग्य नाही. उदाहरणार्थ, पंतप्रधान किसान योजनेत कोणतीही माहिती देताना, कोणतीही माहिती भरण्यात चूक केल्याने आपला पत्ता किंवा बँक खाते चुकीचे दिले जाऊ शकते. याशिवाय राज्य सरकारकडून करेक्शन पेंडिंग असतानाही पैसे येत नाहीत. बँक खाते बंद असेल तरीही पैसे थांबवले जाऊ शकतात. प्रधानमंत्री किसान निधी योजनेसाठी आपली दिलेली माहिती शेतकरी gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर तपासू शकतात. SSY, SCSS, NSC Vs PPF: ‘या’ पोस्ट ऑफिस बचत योजना सुपरहिट आहेत, लोकप्रियतेमध्ये पीपीएफलाही टाकलं मागं तुमची माहिती कशी तपासाल? माहिती तपासण्यासाठी शेतकर्‍यास pmkisan.gov.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उजवीकडे एक फार्मर कॉर्नर असेल. त्यावर क्लिक करा. यानंतर, लाभार्थी राज्यांवर क्लिक करा. त्यानंतर आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल. आधार क्रमांक एंटर करून डेटा गेट वर क्लिक करा. त्यानंतर सर्व माहिती आणि समोर येईल. यामध्ये, आपण दिलेली सर्व माहिती योग्य आहे की नाही हे आपण तपासू शकता. जर कोणतीही माहिती चुकीची असेल तर आपण त्यात बदल करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात