जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ITR: कोणतंच काम करत नाही किंवा हाउस वाइफ आहात? तरीही ITR भरणे गरजेचे, होतात मोठे फायदे

ITR: कोणतंच काम करत नाही किंवा हाउस वाइफ आहात? तरीही ITR भरणे गरजेचे, होतात मोठे फायदे

इन्कम टॅक्स रिटर्न

इन्कम टॅक्स रिटर्न

Income Tax Return : असेसमेंट ईयर 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख जवळ येत आहे. आयकर विभागाकडून यासाठी 31 जुलै 2023 ची तारीख ठरवण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जुलै : तुम्ही नोकरी किंवा बिझनेस करत नसाल तरीही तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलं पाहिजे. एवढंच नाही तर होम मेकर महिलांनी देखील रिटर्न दाखल करणे फायदेशीर ठरु शकते. हे करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल पण यामधून मिळणारे फायदे पाहून तुम्ही चकीत व्हाल. चला तर मग जाणून घेऊया बेरोजगार आणि हाउस वाइफनी का भरायला हवा रिटर्न?

News18लोकमत
News18लोकमत

31 जुलै ही रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आहे असेसमेंट ईयर 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख झपाट्याने जवळ येतेय. इन्कम टॅक्स विभागाने यासाठी 31 जुलै 2023 ही तारीख निश्चित केली आहे. ही डेडलाइन आणखी वाढवण्याची शक्यता नाही आणि महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैच्या पुढे आणखी वाढविण्याचा अर्थ मंत्रालयाचा विचार नाही. सामान्यतः हाउस वाइफ कधीच इन्कम टॅक्स भरण्याचा विचार करत नाही. कारण त्यांचं कोणतंही नियमित इन्कम नसतं. पण असा विचार करणं चुकीचं आहे. कारण आजच्या काळात लोन घेण्यापासून तर व्हिजा मिळवण्यापर्यंत सर्वच गोष्टींसाठी डॉक्यूमेंट खूप आवश्यक मानले जातात. या सर्वच डॉक्यूमेंट्सची गरज पडत असते. यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचे असते ते का आपण जाणून घेऊया. Income Tax रिफंडचे 5 नियम, तुम्हाला माहिती असायलाच हवेत, येणार नाही कोणताच प्रॉब्लम! हाउस वाइफ निलमध्ये ITR भरु शकतात जे कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत किंवा गृहिणी आहेत त्यांनी Nil ITR भरावे. खरंतर, हे असे आयकर रिटर्न आहे, ज्यामध्ये कोणतीही टॅक्स लायबिलिटी नसते. म्हणजे तुमच्यावर कोणताही कर लावला जात नाही, तरीही तुम्ही ITR भरत आहात. म्हणून त्याला Nil ITR म्हणतात. याद्वारे तुम्हाला अनेक कामांमध्ये सुविधा मिळतात. जसे की आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घ्यावे लागले तर ते आवश्यक आहे. निलमध्ये आयटीआर दाखल करण्याच्या फायद्यांची यादी खूप मोठी आहे. Loan घेणं सोपं होतं अशा लोकांना टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक नाही. परंतु जर एखादी गृहिणी आयटीआर भरत असेल तर तिला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागेल असे अजिबात होत नाही. गृहिणींनी आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर लोनची गरज पडते. अशा वेळी इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या महिलांसाठी ते सहज मंजूर होते. लोन रिलीज करण्यासाठी जास्तीत जास्त बँकांमध्ये एक ते तीन वर्षाच्या रिटर्नचा रेकॉर्ड सादर करावा लागतो. ITR: घरभाडं मिळत असेल तर द्यावा लागेल टॅक्स, पण या ट्रिकने बचावासाठी करता येतं जुगाड Visa मिळण्यात होते मदत तुम्ही कोणत्याही उत्पन्नाशिवाय दरवर्षी निल आयटीआर फाइल केल्यास तुमच्यासाठी व्हिसा मिळणे सोपे होऊ शकते. व्हिसासाठी अर्ज करताना 3 वर्षांसाठी आयटीआर भरण्यासाठी कागदपत्रांची मागणी केली जाते. खरंतर, याद्वारे विभागाला कळते की ज्या अर्जदाराने अर्ज केला आहे तो प्रत्येक कायद्याचे पालन करतो आणि प्रवासादरम्यान आणि परत येईपर्यंत त्याच्याकडे पुरेसे आर्थिक स्रोत आहेत. मालमत्ता विक्री किंवा गुंतवणूक गृहिणींसाठी शून्य ITR भरण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे जेव्हा त्या त्यांच्या स्वतःच्या नावावर रजिस्टर्ड संपत्ती म्हणजेच जमीन किंवा घर विकतात. किंवा स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. संपत्ती विकणे किंवा शेयर बाजारात गुंतवणुकीवर होणाऱ्या इन्कम दरम्यान कॅपिटल गेनवर जे टॅक्स दायित्व बनते. अशा वेळी आयटीआर भरणे तुमच्यासाठी गरजेचे होते. सेव्हिंग स्किम, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत वाढ झाल्यास, आयकर विभागाच्या नियमांनुसार तुम्हाला आयटीआरद्वारे कर लाभ मिळू शकतात. याशिवाय, आयकराच्या कक्षेत येत नसले तरी, तुमच्या बँक जमावर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नावर मिळालेल्या व्याजावर कापलेला टीडीएस परत मिळण्यास मदत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात