Home /News /money /

PM Kisan: शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळू शकतात 4000 रुपये, आता लाभ मिळवण्यासाठी जमा करा ही कागदपत्र

PM Kisan: शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळू शकतात 4000 रुपये, आता लाभ मिळवण्यासाठी जमा करा ही कागदपत्र

PM Kisan: शेतकऱ्यांना यावेळी 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर आवश्यक कागदपत्र जमा करून यात नोंदणी करा

    नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा  (PM kisan Samman Nidhi) फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया अहवालांनुसार, लवकरच मोदी सरकार शेतकऱ्यांना हे गिफ्ट देऊ शकतं. मीडिया अहवालांनुसार, केंद्र सरकार (Central Government) पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत दुप्पट करण्याचा विचारात आहे. जर असे झाले तर पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये मिळतील. द्यावी लागेल ही माहिती 2019 मध्ये सुरू झालेल्या योजनेमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या, ज्या सरकारने दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन नोंदणी केली आहे त्यांना आता अर्जामध्ये त्यांच्या जमिनीचा प्लॉट क्रमांक नमूद करावा लागेल. दरम्यान या नवीन नियमांमुळे योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थ्यांवर परिणाम होणार नाही. हे वाचा-PM Modi राजवटीत शेअर बाजारात 'अच्छे दिन'! सेन्सेक्स 25000 वरुन 60 हजारांपार सरकारने या योजनेच्या जुन्या व्यवस्थेत काही बदल केले आहेत. या योजनेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळेल ज्यांच्या नावे शेत आहे. म्हणजेच वडिलोपार्जित जमिनीत वाटा असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. जर तुमच्या नावावर सुद्धा शेत असेल तर हे काम त्वरित करा अन्यथा तुमचा पुढचा हप्ता अडकू शकतो. कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल लाभ पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत त्याच शेतकऱ्यांना लाभ मिळेल ज्यांच्याकडे 2 हेक्टर अर्थात 5 एकर शेतीयोग्य जमीन आहे. आता सरकारने होल्डिंग लिमिट रद्द केली आहे. पण जर कोणी आयकर रिटर्न भरत असेल तर त्याला पीएम शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही. यामध्ये वकील, डॉक्टर, सीए वगैरेही या योजनेच्या बाहेर आहेत. हे वाचा-मुंबईतील या बँकेवर RBI ने ठोठावला 79 लाखांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम? कधी मिळतो फायदा? या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो. या चुकांमुळे अडकतील पैसे अनेकदा सरकारकडून पैसे पाठवले जातात मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. लाभार्थ्यांनी केलेल्या काही चुका यामागील कारण असू शकतात. तुम्ही आधार कार्ड, अकाउंट क्रमांक किंवा नावात चूक केली असेल तर योजनेच्या लाभाची रक्कम अडकू शकते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Farmer, Money, PM Kisan

    पुढील बातम्या