Home /News /money /

Home Loan घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, घर खरेदी करताना येणार नाहीत अडचणी

Home Loan घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, घर खरेदी करताना येणार नाहीत अडचणी

home loan

home loan

Benefits of joint home loan: तुम्ही जॉइंट होम लोन घेण्याचा विचार करत असाल तरी ही प्रक्रिया सोपी देखील आहे, शिवाय त्याचे फायदेही आहेत. तुम्ही पती-पत्नी किंवा जवळच्या व्यक्तीसह जॉइंट अकाउंट उघडू शकता.

    मुंबई, 16 जानेवारी: घरखरेदी करण्यासाठी प्रत्येकजण खटाटोप करत असतो. प्रत्येकाचं घरखरेदीचं स्वप्न असतं. अनेकजण घरखरेदीसाठी आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई खर्च करतात. गृहकर्जासाठी देखील अर्ज करावा लागतो. पूर्वी लोन मिळवण्यासाठी देखील मोठ्या प्रक्रियेतून जावे लागत असे, मात्र आता काही क्षणांमध्ये लोन उपलब्ध होते. त्यामुळे घर खरेदी करणे अत्यंत सोपे आहे. दरम्यान तुम्ही जॉइंट होम लोन (Benefits of joint home loan) घेण्याचा विचार करत असाल तरी ही प्रक्रिया सोपी देखील आहे, शिवाय त्याचे फायदेही आहेत. तुम्ही पती-पत्नी किंवा जवळच्या व्यक्तीसह जॉइंट अकाउंट उघडू शकता. टॅक्स बचतीसह अनेक फायदे तुम्हाला मिळतील. दरम्यान कर्ज फेडताना एखादा हप्ता चुकला तर ते दोघांसाठीही त्रासदायक ठरू शकतं. तुम्ही जर एकत्र मिळून अशाप्रकारे होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सर्वात आधी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही कोणत्या बँकेतून लोन घेणार आहात, त्याठिकाणी व्याजदर काय आहे आणि लोन किती कालावधीत चुकते करायचे आहे इ. बाबी समजून घेणे आवश्यक आहे. यानंतर लोनसाठी अर्ज करा. तुम्ही संयुक्त स्वरुपात कर्ज घेणार असाल तर त्याचेही अनेक फायदे आहेत. हे वाचा-आज एक लीटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार, वाचा लेटेस्ट दर इथे कर्जाचा भार कमी होतो पती पत्नी मिळून जर कर्ज घेणार असाल तर या कर्जाचा भाव विभागला जातो, हा एक महत्त्वाचा फायदा आहे. तुम्ही दोघे मिळून मोठे घर खरेदी करू शकता. सरकार महिलांना रजिस्ट्रेशन शुल्कावर काही सूट देते, त्याचा फायदा तुम्हाला घेता येईल. तुम्ही दोघेही करदाता असाल तर दोघे वेगवेगळ्या करसवलतीचा क्लेम करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अधिक सूट मिळेल. होम लोनचा विमा अवश्य करा पती-पत्नी दोघांनीही घरासाठी कर्ज घेतले आहे, आणि यापैकी कोणाचाही मृत्यू झाला तर संपूर्ण कर्ज फेडण्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर येते. अशी घटना टाळण्यासाठी गृहकर्जाचा विमा काढलाच पाहिजे. विम्याच्या बाबतीत, कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते. हे वाचा-LIC Jeevan Pragati Scheme : दरमाह 6000 वाचवा आणि 28 लाख मिळवा टेन्योर निवडताना विचार करा जेव्हा तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करता तेव्हा किती कालावधीत तुम्ही कर्ज फेडणार आहात त्या मुदतीबाबत अर्थात टेन्योरबाबत विचार करून निर्णय घ्या. कारण या कार्यकाळाच्या आधारावर ईएमआय निश्चित केला जातो. बँका साधारणपणे 5 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज देतात. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार योग्य कार्यकाळ निवडावा. तुम्ही कमी कालावधी निवडल्यास, कर्जाचे हप्ते लवकर पूर्ण होतील, परंतु तुम्ही जास्त कालावधी निवडल्यास, दरमहा येणारा आर्थिक ताण कमी असेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Home Loan

    पुढील बातम्या