मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बंपर कमाईनंतर PNB, Tata Power, NALCO या स्टॉक्समध्ये थांबावं की बाहेर पडावं? काय आहे तज्ज्ञांचं मत?

बंपर कमाईनंतर PNB, Tata Power, NALCO या स्टॉक्समध्ये थांबावं की बाहेर पडावं? काय आहे तज्ज्ञांचं मत?

बंपर कमाईनंतर नाल्को, पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), टाटा पॉवर (Tata Power) या शेअरमधून बाहेर पडावं की आणखी नफ्याची वाट पाहावी, याबद्दल रिलायन्स सिक्युरिटीजचे विकास जैन (Vikas Jain Reliance Securities) यांनी काय म्हटलं जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 19 ऑक्टोबर : शेअर बाजारात काल विक्रमी उसळी पाहायला मिळाली. अनेक शेअर्स तेजीत दिसले. आयटी, मेटल, बँकिंग-फायनान्शिअल क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर निर्देशांक नवीन उच्चांकाकडे जाताना दिसला. सेन्सेक्स (Sensex) काल 459.64 अंकांच्या वाढीसह 61,765.59 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी (Nifty) 138.50 अंकांच्या वाढीसह 18,477 वर बंद झाला होता.

शेअर बाजारातील (Share Market) कालच्या उच्चांकी उसळीमध्ये अॅल्युमिनिअम कंपनी नाल्को (NALCO ) फोकसमध्ये होती. इंट्राडेमध्ये कंपनी मल्टी ईअर हायपर्यंत पोहोचली होती. कालच्या दिवसअखेर हा स्टॉक 13.10 टक्क्यांच्या वाढीसह 121.70 रुपयांवर बंद झाला. तर आज काहीशी पडझड झालेली टाटा पॉवरच्या शेअरला F&O सेगमेंटमध्ये सर्वाधिक फायदा झाला. हा शेअर इंट्रा डेमध्ये 264.85 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आणि ट्रेडिंगच्या शेवटी 15.59 टक्क्यांच्या वाढीसह 257.30 वर बंद झाला.

याशिवाय सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक ही काल बँक निफ्टीमध्ये टॉप गेनर ठरली. PNB चा शेअर काल 48.20 रुपयांच्या इंट्राडे (Intraday Trading) उच्चांकावर पोहोचला आणि मार्केट बंद झाल्यावर 8.11 टक्क्यांच्या वाढीसह 46 वर बंद झाला. आता बंपर कमाईनंतर नाल्को, पंजाब नॅशनल बँक, टाटा पॉवर या शेअरमधून बाहेर पडावं की आणखी नफ्याची वाट पाहावी, याबद्दल रिलायन्स सिक्युरिटीजचे विकास जैन यांनी काय म्हटलं जाणून घेऊया.

Tata चा 'पॉवर'फुल शेअर! गुंतवणूकदारांची 15 दिवस आधीच दिवाळी

NALCO

जगभरातील अॅल्युमिनियमच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे NALCO कंपनीच्या स्टॉकने मोठ्या वॉल्यूमसह 10 वर्षांचा ब्रेक आऊट दिला आहे. या कंपनीचा शेअर 132-142 रुपयांच्या रेंजमध्ये 2008 मध्ये पोहोचला होता. त्यामुळे आता जर 109 रुपयांच्या आसपास घसरण झाली तर या स्टॉकमध्ये खरेदी करण्याची चांगली संधी असेल. ज्यांच्याकडे हा शेअर आहे त्यांनी 135 रुपयांचे लक्ष्य ठेवून या स्टॉकमध्ये राहावे, असं विकास जैन यांनी सांगितलं.

Tata Power

टाटा पॉवरच्या शेअरमध्ये महिनाभरात मोठी तेजी पाहायला मिळाली. हा शेअर 210 चा स्टॉपलॉस ठेवून होल्ड केला पाहिजे. 300-320 रुपयांची रेंज मिळाल्यानंतर यातून आणखी नफा मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे टाटा पॉवरच्या शेअरसाठी 320 रुपयांचे लक्ष्य ठेवण्याचा सल्ला विकास जैन यांनी दिला.

Radhakishan Damani कमी करतायंत या कंपनीतील शेअर्स! तज्ज्ञांनाही बसला धक्का

Punjab National Bank

बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा अंडर परफॉर्मर शेअर पैकी एक हा शेअर आहे. आता हा शेअर त्याच्या कन्सोलीडेशन रेंजमधून बाहेर येण्याच्या प्रयत्नात आहे. 50 रुपयांच्या आसपास थोडा रजिस्टन्स आहे, जी त्याची 34 महिन्यांची सरासरी आहे. या स्टॉकमधील चढता आलेख पुढेही सुरु राहू शकतो. पुढील काही महिन्यांत हा स्टॉक 55 रुपयांवर देखील पोहोचू शकतो. त्यामुळे 55 रुपयांच्या टार्गेटसह हा शेअर होल्ड करु शकता, असं विकास जैन यांनी म्हटलं.

First published:

Tags: Pnb bank, Share market, Tata group, Tata powar