• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 'या' शेअरने गुंतवणुकदारांना केलं मालामाल; वर्षभरात लाखाचे झाले सहा लाख रुपये

'या' शेअरने गुंतवणुकदारांना केलं मालामाल; वर्षभरात लाखाचे झाले सहा लाख रुपये

अवघ्या 12.90 रुपये किमतीचा एचएफसीएलचा शेअर एका वर्षात प्रचंड उसळी घेऊन 77.05 रुपयांवर गेला आहे. किमतीतला चढ-उतार

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 जुलै : कोरोना साथीच्या काळातही मागचं वर्ष शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं ठरलं आहे. गेल्या वर्षभरात बड्या कंपन्यांच्या शेअर्सऐवजी छोट्या, मध्यम कंपन्यांच्या शेअर्सनी मोठी तेजी दाखवून गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. अनेक स्मॉल कॅप (Small Cap), मिड कॅप (Mid Cap) शेअर्स मल्टीबॅगर (Multi Bagger) ठरले असून, त्यांनी 100 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे अगदी किरकोळ गुंतवणुकीतूनही गुंतवणूकदारांना प्रचंड नफा झाला आहे. काही शेअर्सनी मल्टीबॅगरपेक्षाही कितीतरी पट अधिक नफा दिला आहे. 2021 मधल्या स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सच्या यादीतल्या अशाच एका शेअरबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा शेअर आहे एचएफसीएलचा (HFCL). ही टेलिकॉम क्षेत्रातली (Telecom Sector) कंपनी असून, या शेअरनं एका वर्षात तब्बल 500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. हा शेअर मल्टीबॅगरपेक्षाही अधिक फायदा देणारा ठरला आहे. अवघ्या 12.90 रुपये किमतीचा एचएफसीएलचा शेअर एका वर्षात प्रचंड उसळी घेऊन 77.05 रुपयांवर गेला आहे. खूशखबर! तुमच्या पगारात पुढच्या वर्षी होणार मोठी वाढ, या क्षेत्रांमध्ये पगारवाढ अपेक्षित किमतीतला चढ-उतार गेल्या एका महिन्यामध्ये 16 टक्के परतावा देणाऱ्या या शेअरमध्ये गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये 2.52 टक्क्यांची घसरणही दिसून आली; पण त्याआधी गेल्या एका महिन्यात हा शेअर 66.80 रुपयांवरून वधारून 77.05 रुपयांवर पोहोचला होता, तर गेल्या 6 महिन्यांत त्यात 151 टक्क्यांची वाढ झाली होती. या कालावधीत तो 30.85 रुपयांवरून 77.05 रुपयांवर गेला आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून बदणार Demat खात्यासंदर्भातील नियम नफ्याचं गणित एखाद्या गुंतवणूकदारानं एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला अवघ्या एका महिन्यानंतर 1.16 लाख रुपये मिळाले असते. तसंच कोणी 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर 6 महिन्यांत त्याला 2.51 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी एचएफसीएलचे एक लाख रुपयांचे शेअर्स घेऊन ठेवले असते तर त्याला आता 6.78 लाख रुपये मिळाले असते. म्हणजेच त्याची एक लाख रुपयांची गुंतवणूक तब्बल 6 पटीनं वाढली असती. वर्षभरापूर्वी अवघी 12.90 रुपये किमत असलेल्या या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणुकदार आता मालामाल झाले असून, या शेअरनं त्यांना आश्चर्यकारक नफा मिळवून दिला आहे. अर्थात यासाठी महत्त्वाची ठरली ती शेअर्स घेऊन दीर्घ काळ वाट बघण्याची गुंतवणूकदारांची तयारी. 'सब्र का फल मीठा होता है' याची प्रचीती या शेअरने दिली आहे.
  First published: