नवी दिल्ली, 24 जुलै: कोरोना काळात (Coronavirus) अनेकांची नोकरी गेली आहे, तर काहींना पगारकपातीचा (Pay Cut) सामना करावा लागत आहे. मात्र येणारं वर्ष अनेकांसाठी फायद्याचं ठरू शकतं. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये तुमच्या पगारात (Employees Salary Hike) वाढ होऊ शकते. देशातील कंपन्या हळूहळू लॉकडाऊनच्या फटक्यातून सावरू लागल्या आहेत. शिवाय नव्या अर्जदारांचा पुरवठा आवश्यकतेपेक्षा कमी आहे, त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढू शकतो.
8 टक्क्यांनी वाढू शकतो पगार
Michael Page and Aon Plc नुसार, कोरोनाची तिसरी लाट जर नियंत्रणात राहिली तर एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांचा पगार साधारण 8 टक्क्यांनी वाढू शकतो.
हे वाचा-‘कोंकण हे फक्त मजा करण्यासाठी नाही’; भरत जाधव मागतोय मदतीचा हात
आर्थिक वृद्धीमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा
संपूर्ण आशिया खंडातील इतिहासात भारताने नेहमीच सर्वाधिक वाढ नोंदविली आहे. अहवालानुसार पुढील दोन वर्षे हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे. परंतु अलीकडच्या वर्षांत महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे घट झाली आहे. विशेषतः कोरोना साथीच्या काळात दररोजच्या वस्तूंच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत.
हे वाचा-Gold Price Today: 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदी करण्याची सुवर्णसंधी!
या क्षेत्रात पाहायला मिळेल पगारवाढ
ई-कॉमर्स, फार्मास्युटिकल, आयटी आणि वित्तीय सेवा इ. या क्षेत्रात आधीच पगार वाढवण्याची ऑफर दिली आहे. Aon Plc मध्ये भारत आणि दक्षिण आशियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर रूपंक चौधरी च्या मते, संघटित क्षेत्रासाठी कुशल कामगारांच्या कमी उपलब्धतेमुळे पगाराची वाढ अपेक्षित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.