सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने होळीच्या दिवशी आपल्या लाखो ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. सरकारी बँकेने होम लोनच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. इतर बँका व्याजदर वाढवत असताना बँकेने गृहकर्जावरील व्याज कमी करण्याची घोषणा केली. कारण आरबीआयने रेपो दरात सातत्याने वाढ केली आहे. मात्र, बँक ऑफ बडोदाची ही विशेष घोषणा केवळ निश्चित तारखेसाठी आहे.
बँक ऑफ बडोदाने रविवारी म्हणजेच 5 मार्च रोजी होम लोन आणि MSME लोनवरील व्याजात कपात करण्याची घोषणा केली . जारी केलेल्या निवेदनात बँकेने म्हटले आहे की, होम लोनचा दर 40 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.40% ते 8.5% ने कमी केला आहे. त्याच वेळी, MSME कर्जावर 8.4% दराने व्याज घेण्यास सुरुवात करेल.
बँक होम लोनवरील प्रोसेसिंग फीसमध्ये देखील पूर्णपणे सूट देत आहे. MSME लोनच्या प्रोसेसिंग फीसवर 50% सूट देत आहे. शुक्रवारी बँक ऑफ बडोदाचा शेअर बीएसईवर 5 टक्क्यांनी वाढून 172.95 रुपयांवर बंद झाला.
जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन्ही प्रकारच्या कर्जावरील कमी केलेले दर 5 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. यासोबतच हे नवे दर 31 मार्च 2023 पर्यंतच लागू होतील, असेही सांगण्यात आले. स्वतःचं घर खरेदी करण्याचा प्लान करताय? ही ट्रिक फॉलो करुन दुप्पट करता येईल टॅक्स सेविंग