मराठी बातम्या /बातम्या /मनी /

या 5 कारणांमुळेही नाकारला जाऊ शकतो तुमचा Health Insurance Claim, अशी घ्या काळजी

या 5 कारणांमुळेही नाकारला जाऊ शकतो तुमचा Health Insurance Claim, अशी घ्या काळजी

आरोग्य विम्याचा दावा (Insurance Claim) मंजूर होण्याची प्रक्रिया ही सर्वांत कंटाळवाणी असते. दावा मंजूर झाला तरीसुद्धा, किती पैसे दिले जातील याचीही खात्री नसते. अशावेळी आधीच काळजी घेतली, तर दावे मंजूर होताना अडचणी येत नाहीत.

आरोग्य विम्याचा दावा (Insurance Claim) मंजूर होण्याची प्रक्रिया ही सर्वांत कंटाळवाणी असते. दावा मंजूर झाला तरीसुद्धा, किती पैसे दिले जातील याचीही खात्री नसते. अशावेळी आधीच काळजी घेतली, तर दावे मंजूर होताना अडचणी येत नाहीत.

आरोग्य विम्याचा दावा (Insurance Claim) मंजूर होण्याची प्रक्रिया ही सर्वांत कंटाळवाणी असते. दावा मंजूर झाला तरीसुद्धा, किती पैसे दिले जातील याचीही खात्री नसते. अशावेळी आधीच काळजी घेतली, तर दावे मंजूर होताना अडचणी येत नाहीत.

नवी दिल्ली, 16 जून : आजच्या काळात आरोग्य विमा (Health Insurance) अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. वाढत्या वैदयकीय खर्चामुळे जमवलेली पुंजी न संपवता दर वर्षी थोडे पैसे भरून गरजेला एकरकमी खर्च निभावणारा हा पर्याय उपयुक्त ठरतो. सध्याच्या कोविड काळात तर याची गरज अधिकच अधोरेखित झाली. मात्र आरोग्य विम्याचा दावा (Insurance Claim) मंजूर होण्याची प्रक्रिया ही सर्वांत कंटाळवाणी असते. दावा मंजूर झाला तरीसुद्धा, किती पैसे दिले जातील याचीही खात्री नसते. अशावेळी आधीच काळजी घेतली, तर दावे मंजूर होताना अडचणी येत नाहीत. त्यामुळे खालील पाच गोष्टींबाबत काळजी घेतल्यास दावे मंजूर होण्यातल्या अडचणी कमी होतील.

खोली-भाडे मर्यादा आणि कपात -

पुरेशी विमा रक्कम असूनही अनेकदा फार कमी रक्कम मंजूर केली जाते. हॉस्पिटलमधील खोली भाडे मर्यादेचं (Hospital Room Rent) कारण दाखवून ही कपात केलेली असते. बहुतेक पॉलिसीमध्ये विम्याच्या एकूण रकमेच्या एक ते 2 टक्के रकमेइतकी खोली भाड्याला परवानगी असते. त्यापेक्षा जास्त भाडं असेल त्याचा भार तुम्हालाच सोसावा लागतो. अशावेळी मंजूर केलेली रक्कम भागिले दावा केलेली रक्कम एवढीच रक्कम मिळते. उदाहरणार्थ, तुम्हाला पाच हजार रुपये भाडे मर्यादा असेल आणि तुम्ही दहा हजार रुपये भाडे असलेली रूम घेतली असेल, तर पाच हजार भागिले दहा हजार याचं उत्तर जे येईल तेवढ्या प्रमाणात रक्कम मंजूर केली जाईल. ही रक्कम तुमच्या मान्य रकमेपेक्षाही कमी असेल. त्यामुळे नेहमी रूम भाडं किती आहे हे लक्षात घ्या. आपल्या पॉलिसीत असलेल्या मर्यादेतीलच रूम घ्या. शक्य नसेल तर जास्तीची रक्कम भरण्याची तयारी ठेवा.

(वाचा - ऑफिस सुरू करण्यासाठी कंपन्या तयार?वाचा सर्व्हेनुसार काय आहे कर्मचाऱ्यांचं म्हणणं)

हॉस्पिटलायझेशन -

आरोग्य विमा योजना केवळ ‘वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक’ (Medically Necessary) रुग्णालयीन खर्चासाठीच कव्हर देते. त्याची व्याख्या खालीलप्रमाणे आहे.

एखाद्या व्यक्तीस वैद्यकीय व्यवस्थापनासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करणं आवश्यक आहे. प्रमाणित डॉक्टर उपचार करतात. हे उपचार आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा भारतात स्वीकारलेल्या व्यावसायिक वैद्यकीय मापदंडानुसार असतात.

या सर्व अटी पूर्ण होत नसतील, तर आपला दावा वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नव्हता या कारणावरून नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी उपचार करणाऱ्या डॉक्टरांची रूग्णालयात दाखल होण्याची शिफारस लेखी स्वरूपात घ्या.

अ‍ॅक्टिव्ह लाइन ऑफ ट्रीटमेंट -

आरोग्य विम्याची रक्कम मिळवण्यासाठी रूग्णालयात दाखल होत असताना रुग्णाला अ‍ॅक्टिव्ह लाइन ऑफ ट्रीटमेंट (Active Line of Treatment - म्हणजे रुग्णावर कशा स्वरूपाचे उपचार केले जाणार आहेत याची माहिती) माहीत असणं आवश्यक आहे. याचा अर्थ काय? एखाद्याला केवळ निरीक्षण, निदान चाचण्या किंवा देखरेखीच्या उद्देशानं दाखल करण्यात आलं असेल कोणत्याही उपचारासाठी नाही, तर विमा दावा करता येत नाही.

कोविड काळात याचा अनेकांना अनुभव आला आहे. कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर केवळ क्वारंटाईन करण्यासाठी रूग्णालयात ठेवलं असेल आणि उपचार चालू नसतील तर असे दावे मान्य केले जाणार नाहीत.

वाजवी आणि कस्टमरी क्लॉज -

आरोग्यावरील वाढत्या खर्चामुळे आणि रुग्णालयांचे दर अवाजवी वाढत असल्याने हे कलम विमाधारकांना अवास्तव शुल्कापासून वाचवण्यास मदत करतं. यामध्ये रुग्णाला दाखल केलेल्या हॉस्पिटलनुसार, त्याच भागातील समान दर्जाच्या हॉस्पिटलच्या चार्जेसची तुलना करून वाजवी शुल्काचे अनुमान लावले जाते. त्यामुळे त्यापेक्षा अधिक चार्जेस लावलेले असतील, तर ते तुम्हाला भरावे लागतील.

(वाचा - TV, फ्रीज, लॅपटॉप खरेदी करणं महागणार, जुलैपासून 10 टक्क्यांपर्यंत वाढणार किमती)

रुग्णालयांनी लादलेल्या किंमतींवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तरीही आपण आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत दक्षता बाळगू शकतो. प्रत्येक बिलाची काळजीपूर्वक तपासणी करा. शक्य असेल तर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तिथल्या खर्चाचा अंदाज घ्या आणि त्या खर्चाची जवळपासच्या समान दर्जाच्या हॉस्पिटलशी तुलना करा. तुम्ही दाखल होणार असलेलं रुग्णालय अवास्तव दर आकारत आहे, असं लक्षात आलं तर तुम्ही स्वतःच्या खिशातून बिल फेडण्यासाठी तयारी करू शकता, किंवा तुलनेने कमी खर्च असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता.

प्रपोजल फॉर्ममधील त्रुटी -

तुम्ही दिलेल्या तपशीलवार, अचूक आणि संपूर्ण वैद्यकीय माहितीच्या आधारेच विमा दावा मंजूर केला जातो. त्यामुळे नेहमी तुम्हाला असलेले सर्व मोठे आजार, किरकोळ आरोग्यविषयक तक्रारी यासह कोणत्याही शस्त्रक्रिया झाल्या असतील तर त्या अशी सर्व माहिती द्या.

तसंच फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. उदाहरणार्थ, फॉर्म (Form) ऑनलाईन भरताना चुकीचा पिन-कोड निवडला जाऊ शकतो. जन्मतारीख किंवा पूर्ण नाव यासारखी आपली वैयक्तिक माहिती चुकीची भरली गेली आणि ती हॉस्पिटलच्या माहितीशी जुळली नाही तर दावा नाकारला जाऊ शकतो.

First published:

Tags: Health, Insurance