Home /News /money /

HDFC Securities चा 'या' एनर्जी स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला; वर्षभरात 45 टक्के रिटर्नचा अंदाज

HDFC Securities चा 'या' एनर्जी स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला; वर्षभरात 45 टक्के रिटर्नचा अंदाज

HDFC Securities चे म्हणणे आहे की Indraprastha Gas चा स्टॉक 12 महिन्यांच्या कालावधीत 700 रुपयांची पातळीवर पोहचू शकतो. विशेष म्हणजे, गेल्या 12 महिन्यांत या शेअरने 16.7 टक्क्यांची वाढ दर्शवली आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investment) करताना जोखीमही असते. मात्र चांगले शेअर निवडून त्यात योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर ती नेहमीच फायदेशीर ठरते. त्यातही तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे योग्य असते. त्यामुळे आज अशाच एका शेअरबद्दल माहिती घेऊया ज्याची शिफारस HDFC Securities ने केली आहे. इंद्रप्रस्थ गॅसमध्ये (Indraprastha Gas) 45.7 टक्क्यांच्या संभाव्य परताव्यासाठी खरेदी सल्ला HDFC Securities ने दिला आहे. इंद्रप्रस्थ गॅसची सध्याची किंमत सुमारे 497 रुपये आहे. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की हा स्टॉक 12 महिन्यांच्या कालावधीत 700 रुपयांची पातळीवर पोहचू शकतो. विशेष म्हणजे, गेल्या 12 महिन्यांत या शेअरने 16.7 टक्क्यांची वाढ दर्शवली आहे. Cryptocurrency मध्ये डील करताना सावधान! RBI म्हणते- डिजिटल करन्सी आहे धोकादायक HDFC सिक्युरिटीजचा अंदाज आहे की Indraprastha Gas Limited चे सरासरी CNG व्हॉल्यूम FY2023 पर्यंत 33 टक्क्यांनी वाढू शकते. तर त्याचे एकूण प्रमाण वार्षिक आधारावर 35 टक्क्यांनी वाढू शकते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, कंपनीच्या विक्रीचे प्रमाण वाढल्याने त्याच्या नफ्यातही वाढ होईल. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की दिल्ली एनसीआर क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यावर सरकारचे लक्ष केंद्रित केल्याने कंपनीला फायदा होईल. आर्थिक वर्ष 2021-24 दरम्यान, कंपनीच्या व्हॉल्यूममध्ये वार्षिक आधारावर 18 टक्के वाढ होऊ शकते. EPFO कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! अकस्मात निधनानंतर नॉमिनीला मिळणार दुप्पट रक्कम Indraprastha Gas Limited ची स्थापना 1989 मध्ये झाली. कंपनीने 1999 मध्ये दिल्लीतील शहर गॅस वितरण प्रकल्प गेलकडून ताब्यात घेतला. संपूर्ण राजधानी प्रदेशात नैसर्गिक वायू पुरवण्याची Indraprastha Gas Limited ची योजना आहे. सीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देत आहे. कंपनी पीएनजीवर आधीच खूप काम करत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या