नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी (EPFO Employees) आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंडळाने EPFO कर्मचार्यांच्या आकस्मिक निधनानंतर नातेवाईकांना देण्यात येणार्या एक्स-ग्रेशिया डेथ रिलीफ फंडाची (Ex-gratia Death Relief Fund) रक्कम दुप्पट केली आहे. याचा फायदा देशभरातील संस्थेच्या 30 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. निधीत केलेली ही वाढ तात्काळ लागू करण्यात आली आहे. यासाठी ईपीएफओने सर्व कार्यालयांना परिपत्रकही जारी केले आहे.
कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना किती मिळेल फंड?
EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ईपीएफओ कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यू झाल्यास आता त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना 8 लाख रुपये मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या निधीअंतर्गत 2006 मध्ये कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्यांना केवळ 5000 रुपये देण्यात येत होते. त्यानंतर ही रक्कम 50 हजार करण्यात आली आणि त्यानंतर 4.20 लाख रुपये करण्यात आले.
हे वाचा-Cryptocurrency मध्ये डील करताना सावधान! RBI म्हणते- डिजिटल करन्सी आहे धोकादायक
आता दर तीन वर्षांनी त्यात 10 टक्के वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ईपीएफओ सदस्यांनी अशी मागणी केली होती की, अकस्मात मृत्यू झाल्यास किमान 10 आणि जास्तीत जास्त 20 लाख रुपये देण्याची मागणी केली होती.
प्रत्येक कर्मचाऱ्याला समान रक्कम मिळेल
EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नॉन-कोविड मृत्यू म्हणजेच नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 8 लाख रुपये मिळतील. ही रक्कम मंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एकसमान आहे. कल्याण निधीतून या रकमेची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त, केंद्रीय कर्मचारी कल्याण समिती आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्या मान्यतेने ही रक्कम वाढवण्यात आली आहे. जर केंद्रीय मंडळाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला असेल, तर 28 एप्रिल 2020 चा आदेश मान्य असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal